चाकण चेस फेस्टिव्हल -2012


                                             
जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेस चाकण मध्ये सुरुवात 
चाकण चेस फेस्टिव्हल -2012

चाकण:वार्ताहर 

चाकण अकादमी व एस.एस.सिकीलकर संस्थेच्या वतीने चाकण मध्ये पुणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी 'चाकण चेस फेस्टिव्हल -2012' या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांना आज (दि.13) पासून सुरुवात झाली. मीरा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांसाठी सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांचे पारितोषिक वितरण शुक्रवारी सायंकाळी येथेच पुण्याचे उपमहापौर दीपक मानकर व चाकण चे उपसरपंच साजिद सिकीलकर ,यांच्या हस्ते होणार आहे.या स्पर्धांचे औपचारिक उदघाटन पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरेश गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी चाकण चे सरपंच काळूराम गोरे,उपसरपंच
साजिद सिकीलकर,अस्लमभाई सिकीलकर, समीर सिकीलकर,अजित सिकीलकर,रामदास जाधव,संतोष साळुंके,प्रा.साहीर सिकीलकर,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे,जयवंत पिंगळे ,पुणे जिल्हा चेस असोशिएशनचे सचिव राजेंद्र कोंडे, मनोज स्वामी  अल्पसंख्यांक सेलचे माजी अध्यक्ष जहीर शेख,आदींसह विविध प्रशालेंचे  प्राचार्य,शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या स्पर्धांमध्ये नऊ ,बारा व सोळा वर्षांखालील स्पर्धकांचे वेगवेगळे गट करण्यात आले आहेत. प्रत्येकी सहा फेऱ्या होणार असून शुक्रवारी (दि.14) अंतिम फेऱ्या मधून विजेते घोषित होणार असल्याचे या स्पर्धांचे आयोजक प्रा.साहीर सिकीलकर व समीर सिकीलकर यांनी सांगितले.या जिल्हास्तरीय स्पर्धां यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हा 
चेस असोसिएशन ,चाकण अकादमी ,गौरव चेस अकादमी,एस.एम.सिकीलकर शिक्षण संस्था प्रयत्न करीत आहेत.
----------
                            अविनाश दुधवडे,चाकण 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)