इंदू मिल च्या निर्णयाने समाधान :लक्ष्मण दुधवडे


इंदू मिल च्या निर्णयाने समाधान :लक्ष्मण दुधवडे
चाकण:वार्ताहर
गेल्या अनेक दिवसां पासून गाजत असलेल्या इंदू मिलची जागा, डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी हस्तांतरित करण्याच्या मागणीला आज संसदेने मंजुरी दिल्याची बातमी
वृत्त वाहिन्यांवरून प्रसारित होताच रिपाई व खेड तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या  कार्यकर्त्यांनी चाकण परिसरात आनंदोत्सव साजरा केला.खेड तालुका भारतीय बौद्ध महासभेचे
अध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी)येथील रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव,तालुकाध्यक्ष संतोष जाधव,चाकण शहराध्यक्ष अशोक गोतारणे ,युवक
अध्यक्ष नितीन जगताप,राहुल गोतारणे,शेखर घोगरे,अभिजीत घोगरे,सतीश आगळे,प्रदीप गायकवाड,
सुमित गायकवाड,अक्षय घोगरे,संजय गोतारणे,सचिन घोगरे,आदींनी या बाबत समाधान व्यक्त केले आहे.
 ही जागा मिळविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध आंबेडकरी संस्था संघटनांनी विशेष प्रयत्न केले होते. शासनाने समाजाच्या भावना
लक्षात घेवून  या बाबतचा निर्णय घेतल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत असल्याचे दुधवडे (गुरुजी ) यांनी सांगितले.
----------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)