चाकण मधील सर्व घडामोडींवर सडेतोड भाष्य करणारा ब्लॉग
प्रेमाच्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीचा खून
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
प्रेमाच्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीचा खून
खून केल्यानंतर मृतदेह टाकला जाळून
चाकण जवळील घटना
चाकण
शुक्रवारी (7 डिसेंबर 12) सकाळी तोंडात बोळा कोंबून युवकास जाळण्यात आलेल्या थरारक खुनाचा छडा चाकण पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत लावला असून ,अनैतिक संबंधात
अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.संपूर्ण पणे जळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या
नातेवाईकांपर्यंत पोहचण्याचे मृतदेहाची ओळख पटविण्याचे आणि संशयीतांना बोलते करण्याचे दिव्य पोलिसांनी पार पाडीत पत्नी आणि प्रियकर या दोघांना आज(दि.12)
गजाआड केले आहे.
संतोष बबन जाधव (वय 33,सध्या रा,लेंडघर वस्ती,नाणेकर वाडी,चाकण मूळ रा.उदापूर,ता.जुन्नर जि.पुणे ) असे खून करण्यात आलेल्या पतीचे नाव असून त्याची
पत्नी शिल्पा संतोष जाधव(वय 23) हिच्या सह तिचा प्रियकर शंकर भानुदास नागरे (वय 21,सध्या रा,लेंडघर वस्ती,नाणेकर वाडी,चाकण मूळ रा.सिबलापूर जि.संगमनेर)
यांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शिल्पा हिने प्रियकर शंकर याच्या मदतीने पतीचा खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जवळील शेतात घेवून जावून
रॉकेल ओतून जाळला. जळलेल्या अवस्थेतील या मृतदेहाला प्रथम बेवारस घोषित करून चाकण पोलिसांनी चार दिवसांपूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयात ठेवले होते.
व त्या नंतर तपासाची चक्रे फिरविली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , संतोष व त्याची पत्नी शिल्पा हे चाकण मध्ये राहण्यास होते.संतोष येथील एमआयडीसीमध्ये कामास होता.संतोष याचा मित्र
शंकर नागरे याचे संबंधितांच्या यांच्या घरी येणे जाणे होते. त्यातून त्याचे संतोषची पत्नी शिल्पा हिच्याशी प्रेमसंबंध प्रेमसंबंध जुळले. या अनैतिक संबंधाची कुणकुण
संतोष ला लागली होती. त्यामुळे तो पत्नीशी वारंवार भांडत होता. शंकर याला माझ्या पत्नीचा नाद सोड म्हणून त्याने दमदाटी केली होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून
संतोष व त्याची पत्नी शिल्पा यांच्यात वाद होत होते.त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून हे दोघे विभक्त झाले होते, तरीही त्यांच्यात अधूनमधून वाद होतच होते.
पत्नीने घराबाहेर काढल्यानंतर जवळच लेंडघरवस्ती (नाणेकर वाडी,चाकण) येथे संतोष पत्नीचा प्रियकर शंकर नागरे याच्याच खोलीत राहत होता. 6 डिसेंबर 12 रोजी
रात्री बारा वाजनेचे सुमारास पत्नी शिल्पा या खोलीत आली .तेंव्हाही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.त्याच वेळी घरातील लाकडी दांडके पत्नी शिल्पा ने पाठीमागील बाजूने जावून
पती संतोष याच्या डोक्यात घातले. त्यावर तो खाली कोसळला ,त्यानंतरही तिने लाकडी दांड्याने संतोष च्या डोक्यात जोरदार प्रहार केले. व तो मृत झाल्याची खात्री झाल्यानंतरही
त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून त्यास शुक्रवारी (दि.7) पाहटे दोन वाजनेचे सुमारास प्रियकर शंकर याच्या मदतीने जवळील शेतात नेवून गोधडीत लपेटून रोकेल ओतून पेटवून
दिला व घटनास्थळावरून पोबारा केला होता . अतिशय निर्दयी पणे पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आलेल्या या खुनाच्या प्रकाराने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती .
...अन खुनाला फुटली वाचा :
पंचवीस ते तीस वर्षीय तरुणास तोंडात बोळा कोंबून जाळून ठार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.7) सकाळी चाकण (ता. खेड) जवळ राणूबाई मळा येथे सावता
माळी मंदिराच्या मागे (लेंडघरवस्ती ,नाणेकरवाडी गावच्या हद्दीत ) उघडकीस आला होता .जाळून ठार केलेल्या युवकाची ओळख दोन दिवस पोलिसांना पटू शकली नव्हती
घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते,श्वान पथक मात्र आरोपींचा
मग काढू शकले नव्हते. या संदर्भात चाकण पोलीस ठाण्यात शिवाजी मारुती लेंडघर (रा.लेंडघरवस्ती ,नाणेकरवाडी,चाकण ) यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली होती चाकण पोलिसांनी
अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता . त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या भागातील सर्व चाळींमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंची कसून तपासणी केली असता ,
शंकर भानुदास नागरे याच्या खोलीतील एक जन बेपत्ता असल्याची माहिती मिळविली. या बाबत शंकर नागरे हा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले ,
त्यानंतर पोलिसांनी आपल्या खाक्या दाखविताच शंकर घडाघडा बोलू लागला. त्यानंतर मयत संतोष याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना जळलेल्या मृतदेहाचे फोटो
दाखविण्यात आले, मात्र नातेवाईकांना फोटो वरून ओळख पटू शकली नाही ,त्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात प्रत्यक्ष जळलेला मृतदेह दाखविण्यात आला असता
संतोष याचे दात (सुळे) एकावर एक असल्याचे नातेवाईकांनी ओळखले व मृतदेहाची ओळख पटविली.
तरीही तपासात पारदर्शकता असावी यासाठी मृत संतोष याची डीएनए चाचणी होणार असल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास खेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत पाटील,चाकणचे पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस.पी.येडे,
कुमार कदम, नवनाथ थिटे, अनंता शिंदे, संजय नाडेकर,नंदकुमार चव्हाण, सुनील नरके, राजेश मोहिते, अमर वंजारी व् त्यांचे सहकारी करीत आहेत.
शिल्पा जाधव व् शंकर नागरे यांच्यावर खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
----------------------------------------------अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५
आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे) श निवार वाडा,पुणे पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण : पुणे पुणे जिल्ह्यातील तालुके : चौदा पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ : १५,६४३ चौ.कि.मी. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या : ५५,३२,५३२ हे पुणे ! शिवरायांनी याच पुण्यात बालपणी संस्करांचे व पराक्रमी धडे गिरविले. पेशवाईमध्ये याच पुण्याचे राजधानीचे स्थान भूषविले. पेशव्यांचे कर्तृत्वही फुलविले याच पुण्याने. असे हे पुणे ! लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी. थोर समाजसुधारक जोतिबा फुल्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यास सुरुवातही येथूनच झाली. या कार्याला प्रेरणाही या पुण्यातच मिळाली आणि…. विरोधही येथेच झाला. समाजपरिवर्तन, सुधारणेच्या कार्यात सर्वस्व झोकून देणाऱ्या अनेक समाजसुधारकांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. याच पुण्यातील सनातन्यांनी आगरकारांच्या हयातीतच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा करंटेपणाही दाखविला. असे हे पुणे ! टिळक व आगरकर असे दोन भिन्न विचार-प्रवाह येथेच निर्माण होतात; कधी हातात हात घालून आपली वाटचाल करतात तर कधी कायमच्याच दोन समांतर रेषा बनतात. गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी), महात्मा जोतिबा फुले, यां
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा