शरद पवारांना सर्वकल्याण ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून शुभेच्छा



                                                                     
                                                                     
                                                                     
                                             
शरद पवारांना सर्वकल्याण ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून शुभेच्छा 
खेड तालुक्यात अनोखा उपक्रम 

चाकण:
 
  केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कडाचीवाडी येथे खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या साक्षीने सर्वकल्याण ज्ञानयज्ञ आयोजित करण्यात आला 
होता .शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने या यज्ञाच्या माध्यमातून 108 वेळा गायत्री मंत्रांचे पठाण करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी अनोखी प्रार्थना केली.
  या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी कोंग्रेस चे खजिनदार प्रतापराव खांडेभराड ,खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 
अध्यक्ष शांताराम भोसले,नानासाहेब टाकळकर ,बाजार समितीचे माजी सभापती हिरामण अण्णा सातकर ,माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई मोहिते,पंचायत समितीच्या 
सभापती कल्पना गवारी, सोमनाथ मुंगसे, कैलास गाळव ,बबनराव अरगडे,भाऊसाहेब होरे,मेदनकर वाडीचे सरपंच दत्तात्रेय भुजबळ, राष्ट्रवादीचे चाकण शहराध्यक्ष 
संदीप परदेशी ,भगवान मेदनकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुणे जिल्हा राष्ट्रवादी कोंग्रेस चे खजिनदार प्रतापराव खांडेभराड  व 
त्यांच्या पत्नी नंदाताई खांडेभराड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.शरद पवार यांच्या दीर्घायुष्य व आरोग्या साठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वकल्याण ज्ञानयज्ञ 
या अनोख्या उपक्रमास याभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पी.के.टेक्निकल कॅम्पस च्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
----------------
                                      अविनाश दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)