उद्योगांत स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या मिळेनात
उद्योगांत स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या मिळेनात
शासनाच्या धोरणाला केराची टोपली
चाकण: चाकण औद्योगिक क्षेत्रातील आणि जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यातील सुक्ष्म, लघु, मध्यम आणि विशाल उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यात यावा या स्थानिकांच्या मागणीला उद्योगांनी वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत. जिल्ह्यामधील सुक्ष्म, लघु, मध्यम आणि विशाल अशा अनेक उद्योगांनी जिल्हा उद्योग केंद्रांकडून विशेष प्रोत्साहने आणि सवलतीचा लाभ घेतला आहे. अशा उद्योगांमध्ये पर्यवेक्षीय श्रेणीत ५० टक्के आणि इतर श्रेणीत ८० टक्के स्थानिक उमेदवारांना नोकरीमध्ये सामावून घेणे आवश्यक आहे. मात्र तसे चित्र येथे पाहायला मिळत नाही. स्थानिकांना कंपन्यांमध्ये नोकरीत सर्रास स्थानिकांना डावलेले जात असल्याचे विदारक वास्तव आहे.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा