कांदा @ १८००
'कांद्या'ला सरासरी अठराशे रुपयांचा भाव
चाकणला ४५ हजार पिशव्यांची आवक
चाकण :
चाकण मार्केट मध्ये होत असलेली कांद्याची आवक ( छायाचित्र: अविनाश लक्ष्मण दुधवडे,चाकण) मो. ९९२२४५७४७५ |
कांद्याच्या भावातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर किमान निर्यात मूल्य टनाला ७०० डॉलरवरून शून्य करण्यात आले. या निर्णयानंतर कांद्याच्या बड्या निर्यातदार कंपन्यांनी कांदा मार्केट कडे धाव घेतली असली तरी अद्याप पर्यंत कांद्याच्या भावात मागील पंधरावड्याप्रमाणे भरघोस वाढ झालेली नाही. सद्यस्थितीत कांद्याच्या भावात क्विंटलला ४०० ते ५०० रुपयांनी वाढ झाली असून कांद्याचे सरासरी भाव प्रतीक्विंटलला १ हजार ८०० रुपयांवर स्थिरावले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा