दुनियादारी ....


दुनियादारी ....
शाळेतील अल्लड दिवस संपल्यानंतर चाकण ( ता. खेड, जि.पुणे) येथील शिवाजी विद्यालयातून १९९३ साली दहावी पास होऊन पुण्यातील डीसीएम सोसायटी ऑफ पुण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आर्ट्स कॉलेज ( नानापेठ, आहील्याश्रम पुणे) मध्ये जाण्याची संधी मिळाली. अकरावीला एकच वर्ष १९९४ साली पुण्यातील कॉलेज मध्ये राहिलो. पण अख्ख आयुष्य या एकाच वर्षात जगलो. ग्रामीण भागातून पुण्यात आल्याने 'दुनियादारी' समजली. कॉलेजमध्ये पास होऊन  पुढच्या प्रवासाला गेलो पण तिथल्या रंजक व रोमहर्षक आठवणी माझ्या आयुष्यभराचा एक खजिना आहे. कॉलेज मधील व्यतीत केलेल्या सुंदर दिवसांचा काळ आणि तिथल्या आठवणी पुन्हा एकदा गोळा करण्यासाठी गेली अनेक वर्षे आसुसलेला होतो. काल (शनिवार दि. ३ फेब्रुवारी २०१८) याच कॉलेजच्या समोरून जात असताना पुन्हा एकदा पावले आपोआप कॉलेजमध्ये वळाली. इतिहासाची पाने डोळ्यासमोर फडफडावी तशा सगळ्या आठवणी आणि सगळ्या मित्र मैत्रानींचे चेहरे डोळ्यासमोर उभे राहिले. सुनील, अजय, आनंद, उषा, वर्षा, माया, राणी, अंजली, गौरी एका पाठोपाठ एक नावे समोर आली.... डोळ्यांच्या कडा कधी ओलावल्या ते कळालेच नाही. कॉलेजच्या आवारात तासभर भटकत राहिलो.... आणि जड पावलांनी पुन्हा निघताना सगळ्या आठवणी मोबाईलच्या कॅमेर्यात कैद करून घेतल्या पुन्हा-पुन्हा पाहण्यासाठी ....
(अविनाश लक्ष्मण दुधवडे,चाकण) मो. ९९२२४५७४७५
 



(अविनाश लक्ष्मण दुधवडे,चाकण) मो. ९९२२४५७४७५
आता 

तेंव्हा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)