पोस्ट्स
2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
चाकण मागोवा २०१७
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चाकण मागोवा २०१७ चाकण: प्रत्येक वर्ष सरते वर्ष नवीन येणाऱ्या वर्षांवर आपल्या पाऊलखुणा उमटवतच पुढे जाते , अनेक घटना घडून जातात , त्यातल्या काहींचे पडसाद नव्या वर्षांवर पडत असतात. २०१७ वर्षे संपत आहे . चाकण मध्ये सरत्या वर्षात गुन्हेगारीचा आलेख वाढतानाच दिसला. वाहतुकीच्या समस्या , अवैध धंदे , चोऱ्या , दरोडे , लुटमारीचे गुन्हे , चाकण पंचक्रोशीतील सोयी- सुविधांची बोंब या सगळ्या समस्येचा आलेख तुलनात्मक दृष्ट्या २०१७ मध्ये वाढताना दिसला. सरत्या २०१७ वर्षातील काही प्रमुख घटनांचा हा मागोवा..... ( अविनाश दुधवडे,चाकण)
उद्योगांत स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या मिळेनात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
उद्योगांत स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या मिळेनात शासनाच्या धोरणाला केराची टोपली चाकण: चाकण औद्योगिक क्षेत्रातील आणि जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यातील सुक्ष्म , लघु , मध्यम आणि विशाल उद्योगांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्यात यावा या स्थानिकांच्या मागणीला उद्योगांनी वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत. जिल्ह्यामधील सुक्ष्म , लघु , मध्यम आणि विशाल अशा अनेक उद्योगांनी जिल्हा उद्योग केंद्रांकडून विशेष प्रोत्साहने आणि सवलतीचा लाभ घेतला आहे. अशा उद्योगांमध्ये पर्यवेक्षीय श्रेणीत ५० टक्के आणि इतर श्रेणीत ८० टक्के स्थानिक उमेदवारांना नोकरीमध्ये सामावून घेणे आवश्यक आहे. मात्र तसे चित्र येथे पाहायला मिळत नाही. स्थानिकांना कंपन्यांमध्ये नोकरीत सर्रास स्थानिकांना डावलेले जात असल्याचे विदारक वास्तव आहे.....
कॉंग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी निलेश कड-पाटील
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कॉंग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी निलेश कड-पाटील निलेश कड - पाटील ( प्रवक्ते - पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी) चाकण: महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस तर्फे चाकण येथील युवा कार्यकर्ते निलेश कड-पाटील यांची पुणे जिल्ह्यातून राज्यस्तरावर प्रवक्ते म्हणून नव्याने निवड करण्यात आली आहे. कॉंग्रेसला बळकटी आणण्यासाठी , पक्षवाढीच्या दृष्टीने विचार करून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार कड-पाटील यांना कॉंग्रेसचे राज्यस्तरावर प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कॉंग्रेसच्या वाढीबरोबरच कॉंग्रेसबाबत टीकाटिप्पणी करणाऱ्यांचा समाचार घेण्याची जबाबदारी कड-पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचे कामही ते करणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हा व ब्लॉक स्तरावर वक्ते व प्रवक्ते म्हणून कड यांना जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. युवा व अभ्यासू कार्यकर्ते म्हणून खेड तालुक्यात परिचित असलेले कड यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी कड यांचे
कांदा @ १८००
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
'कांद्या' ला सरासरी अठराशे रुपयांचा भाव चाकणला ४५ हजार पिशव्यांची आवक चाकण : चाकण मार्केट मध्ये होत असलेली कांद्याची आवक ( छायाचित्र: अविनाश लक्ष्मण दुधवडे,चाकण) मो. ९९२२४५७४७५ कांद्याच्या भावातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर किमान निर्यात मूल्य टनाला ७०० डॉलरवरून शून्य करण्यात आले. या निर्णयानंतर कांद्याच्या बड्या निर्यातदार कंपन्यांनी कांदा मार्केट कडे धाव घेतली असली तरी अद्याप पर्यंत कांद्याच्या भावात मागील पंधरावड्याप्रमाणे भरघोस वाढ झालेली नाही. सद्यस्थितीत कांद्याच्या भावात क्विंटलला ४०० ते ५०० रुपयांनी वाढ झाली असून कांद्याचे सरासरी भाव प्रतीक्विंटलला १ हजार ८०० रुपयांवर स्थिरावले आहेत.
खेड तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारीणी जाहीर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
खेड तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारीणी जाहीर खेड तालुका मराठी पत्रकार संघाची २०१८ या वर्षासाठी नवीन कार्यकारणी निवड प्रक्रिया रविवारी (दि.११ फेब्रुवारी ) अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मध्ये राजगुरुनगर ( ता. खेड) येथील खेड पंचायत समितीच्या शासकीय विश्रामगृहात मध्ये पार पडली. या बैठकी साठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अविनाश ल. दुधवडे, राजेंद्र सांडभोर, कोंडीभाऊ पाचारणे, विद्याधर साळवे आदींसह तालुक्यातील पत्रकार संघाचे सदस्य तुकाराम बोंबले, महेंद्र शिंदे, निवृत्ती नाईकरे, सुनील थिगळे, एम.डी.पाखरे , रामचंद्र सोनवणे, नाजीम इनामदार , वनिता कोरे, ए.पी.शेख, संदीप मिरजे सदाशिव अमराळे, अशोक कडलक, बाळासाहेब सांडभोर, राजेंद्र लोथे, इसाक मुलानी, राजेंद्र मांजरे, कुंडलिक वाळूंज, किरण खुडे, भानुदास पर्हाड आदी सर्व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. मावळते अध्यक्ष नंदकुमार मांदळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वनुमते नूतन कार्यकारणी निवडण्यात आली, यासाठी सर्व सदस्यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक सुनील थिगळे यांनी केले, सूत्रसंचालन अविनाश दुधवडे यांनी केले, तर आदेश टोपे यांनी सर
दुनियादारी ....
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दु नि या दा री .... शाळेतील अल्लड दिवस संपल्यानंतर चाकण ( ता. खेड, जि.पुणे) येथील शिवाजी विद्यालयातून १९९३ साली दहावी पास होऊन पुण्यातील डीसीएम सोसायटी ऑफ पुण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आर्ट्स कॉलेज ( नानापेठ, आहील्याश्रम पुणे) मध्ये जाण्याची संधी मिळाली. अकरावीला एकच वर्ष १९९४ साली पुण्यातील कॉलेज मध्ये राहिलो. पण अख्ख आयुष्य या एकाच वर्षात जगलो. ग्रामीण भागातून पुण्यात आल्याने 'दुनियादारी' समजली. कॉलेजमध्ये पास होऊन पुढच्या प्रवासाला गेलो पण तिथल्या रंजक व रोमहर्षक आठवणी माझ्या आयुष्यभराचा एक खजिना आहे. कॉलेज मधील व्यतीत केलेल्या सुंदर दिवसांचा काळ आणि तिथल्या आठवणी पुन्हा एकदा गोळा करण्यासाठी गेली अनेक वर्षे आसुसलेला होतो. काल (शनिवार दि. ३ फेब्रुवारी २०१८) याच कॉलेजच्या समोरून जात असताना पुन्हा एकदा पावले आपोआप कॉलेजमध्ये वळाली. इतिहासाची पाने डोळ्यासमोर फडफडावी तशा सगळ्या आठवणी आणि सगळ्या मित्र मैत्रानींचे चेहरे डोळ्यासमोर उभे राहिले. सुनील, अजय, आनंद, उषा, वर्षा, माया, राणी, अंजली, गौरी एका पाठोपाठ एक नावे समोर आल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
...त्या सहा खुनांचे गूढ आजही कायम चाकण: (अविनाश दुधवडे) खराबवाडीतील अनोळखी युवतीचा निर्घुण खून ... पाळू येथील जेष्ठ महिला... महाळुंगेतील शेतकरी.... कोरेगाव खुर्द येथील अल्पवयीन मुलगा... चिंचोशी येथील अल्पवयीन मुलगी .....आणि धामनेतील युवतीचा नियोजनबद्ध खून .... अशा सहा खुनांचा तपास पोलिस दफ्तरी प्रलंबित आहे. नुकताच झालेला धामणे खून वगळता इतर खुनांची तपास फाईल जवळपास बंद झाली आहे. स्थानिक पोलिसांसह एलसीबीच्या चाणाक्ष पथकांनासुद्धा या खुनांचा छडा लावता आला नाही. त्यामुळे या सहा खुनाबाबतचे गूढ अद्यापही कायम आहे. यातील सर्व खुनांचे गुन्हे त्या-त्या वेळी दाखल होऊन तपास सुरू झाले , खुनानंतर एलसीबी कडूनही त्याची माहिती घेण्यात आली , मात्र चक्रावून टाकणाऱ्या या खुनाच्या घटनांनी पोलिसांना आजही भंडावून सोडलेले आहे. एलसीबी कडील तंत्रज्ञान आणि खबऱ्यांचा वापर करून आरोपींना पकडले जाते. तसेच बऱ्याचदा खुनाचा छडा लावला जातो. प्रलंबित गुन्ह्याचा तपास , फरारी आरोपींना पकडण्याची जबाबदारी एलसीबी कडे असते. परंतु चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सहापैकी पाच ‘फाईल बंद’ खुनाच