पोस्ट्स

एप्रिल, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रात्रीचा 'मौल्यवान' प्रचार आतापासूनच सुरु

इमेज
रात्रीचा   ' मौल्यवान '   प्रचार आतापासूनच सुरु वैऱ्याची रात्र तव्हा नाय , आताच हाय.... चाकण:    उन्हाची काहिली वाढली असली तर दिवसा भर उन्हात प्रचाराचा धुरळा उडत दिवसाचा प्रचार थंडावला कि रात्री दहा नंतरही छुपा  '  मौल्यवान  '  प्रचार चाकण भागात सुरु झाला आहे. ताई ,  माई ,  आक्कांसह दादा भाऊंनाही साद घालत उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन रात्री दहा नंतर रात्री उशिरा पर्यंत करण्यात येत आहे . साधारणपणे मतदानाच्या आदल्या दिवशीची ती रात्र सर्वार्थाने वैऱ्याची रात्र मानली जाते. त्या रात्रीत मोठ्या उलाढाली होतात. मात्र त्या रात्रीत काहीही करणे शक्य झाले नाही आणि ती रात्र आपल्यासाठीच वैऱ्याची झाली तर .. ?  या विचाराने अनेक दिग्गज उमेदवारांना भंडावून सोडले असून काही चाणाक्ष उमेदवारांनी आता ' कशाला उद्याची बात  '  म्हणत मतदानाच्या चक्क चार-सहा  दिवस आधीच त्या वैऱ्याच्या रात्रीची वाट न पाहता "आतून फिल्डिंग '  लावली आहे. एक गठ्ठा मतदानाच्या अपेक्षेने चाकण मधील एका मोठ्या वस्तीत सोमवारी (दि.७) रात्री दहा नंतर रात्री उशिरा पर्यंत असा   ' मौल्यवान 

राष्ट्रवादीची दादागिरी आणि आढळरावांच्या नाकर्तेपणामुळे मतदार बेजार...

इमेज
राष्ट्रवादीची दादागिरी आणि आढळरावांच्या नाकर्तेपणामुळे मतदार बेजार अशोक खांडेभराड यांची मुलाखत ... चाकण : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा झेंडा हाती घेऊन शिरूर मधील जनतेचा विश्वास जिंकणार असल्याच्या ठाम विश्वास दाखविणारे शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अशोक खांडेभराड यांच्या प्रचार सभांच्या धडक्याने मनसे मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिरूर मध्ये प्रचार सभांचा धडाका लावला असून  रविवारी (दि.१३) राज ठाकरे चाकण मध्ये झंजावाती सभा झाली . त्यांच्या सभांनी खेचलेल्या गर्दीने येथील वातावरण ढवळून निघत असून विरोधी पक्षांची चिंता वाढत आहे. मनसेचे उमेदवार अशोक खांडेभराड यांनीही आपला झंजावाती प्रचार अल्पवधीत पुरा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.  शिरूर लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदारांनी काहीही केले नसल्याचा आणि राष्ट्रवादीच्या आमदारांशी त्यांची फिक्सिंग असल्याचा आरोप करीत त्यांनी मतदार संघ पिंजून काढला या एकूणच निवडणुकी बाबत त्यांच्याशी केलेली खास बातचीत... प्रश्न-     शिरूर मतदार संघाच्या विकासाविषयी तुमची भूमिका काय  ? ख

टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

इमेज
टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार संतप्त जमावाने पेटविले वाहन   जमावाने पेटविल्यानंतर जाळून खाक झालेल्या वाहनाची अशी अवस्था झाली होती (छायाचित्र: सम्राट कम्युनिकेशन )  चाकण : चाकण एमआयडीसीमधील महिंद्रा कंपनी जवळ महाळुंगे- तळवडे रस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी  (दि.११) रात्री आठ वाजनेचे सुमारास घडली  ,  अपघातानंतर जमलेल्या संतप्त जमावाने संबंधित टेम्पो पेटवून दिला आहे. दिनकर शिवाजी काळोखे (वय ३७ ,  रा.विठ्ठलवाडी देहूगाव  ,  ता.मावळ  , जि.पुणे ) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. या बाबतची फिर्याद सुधीर सुदाम काळोखे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार दिनकर काळोखे चाकण एमआयडीसीतील कंपनीतून कामावरून सुटल्या नंतर आपल्या दुचाकीवरून (क्र.एम एच १४ एस ३१४२)  महाळुंगे- तळवडे रस्त्यावरून तळवडे बाजूकडे जात असताना महिंद्रा कंपनी जवळ असलेल्या पुलावर पाठीमागून आलेल्या  टेम्पो ट्रॅव्हलर (क्र.एम एच १२ एफ सी ३४४९)  ठोस बसल्याने ते जागीच ठार झाले. अपघात झाल्याची माहिती मिळाल्य

...तर सगळ्यांना वठणीवरच आणतो

इमेज
स्थानिकांना रोजगार देण्याची राज्यकर्त्यांचीच इच्छा नाही चाकण मधील सभेला संबोधित करताना राज ठाकरे  ( छायाचित्र : सम्राट कम्युनिकेशन ,चाकण)  चाकण मधील सभेत राज ठाकरे यांचे प्रतिपादन चाकण:  चाकण प्रमाणेच महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात गेलं तर एकच ऐकायला मिळतं ,  कारखाने आले. मात्र त्यात परप्रांतिय घुसलेत.  स्थानिक भुमीपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळत नाही  ,  राज्यकर्त्यांची तशी इच्छा नाही  , राज्यकर्त्यांचाच कुणावरही वचक राहिलेला नाही . त्यामुळे  लोकसभा निवडणुकीत तुम्ही साथ द्यालच पण त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्येही साथ द्या  , राज्याची संपूर्ण ताकद एकदा देऊन बघा ,   राज्य माझ्या हातात दिले तर सगळ्यांना वठणीवरच आणतो असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.   चाकण (ता.खेड , जि.पुणे) येथील मार्केट यार्डाच्या भव्य प्रांगणात आज (दि.१३) मनसेचे उमेदवार अशोक खांडेभराड यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यात ठाकरे बोलत होते. मनसेचे अनिल शिदोरे , खा.गजानन बाबर ,  शरद सोनवणे  , रामदास धनवटे ,  अभय वाडेकर  , श्रीकांत जाध

नवाकाळ निष्पक्ष अग्रगण्य दैनिक

इमेज
नवाकाळ निष्पक्ष अग्रगण्य दैनिक  नवाकाळ  हे मराठीतील एक खरोखर निष्पक्ष अग्रगण्य दैनिक आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यातील हे एक आघाडीचे कुठल्याही पक्षाचे नसणारे निर्भीड दैनिक असून खास वृत्तांत, मथळे ,मुलाखती व बातम्यांमधील विश्वासार्हता यामुळे इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या भस्मासुरात या दैनिकाने मुंबई सह राज्य मध्ये  आजही खोलवर पाय रोवले आहेत. पुरोगामी विचाराचे दैनिक नवाकाळ मुंबई येथून प्रकाशित होणारे मराठी भाषीक दैनिक आहे.   या वर्तमान पत्राच्या http://navakal.org/ या संकेत स्थळावरील इतिहास त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाची इत्यंभूत माहिती देत आहे. त्या संकेत स्थळावर दिलेल्या माहिती नुसार  नाट्याचार्य खाडिलकर यांनी ७ मार्च १९२३ रोजी दैनिक 'नवाकाळ' ची स्थापना केली. त्यांनी 'नवाकाळ' धडाडीने यशस्वी केला. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर नवाकाळमधील अग्रलेख आणि टिका टिप्पणी याबद्दल राजद्रोहाचा खटला ( ९ फेब्रुवारी १९२९ ) भरला. २७ मार्च रोजी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंडाची सजा झाली. पण तो ब्रिटिशांचा तुरुंग होता. त्यांनी जातानाच मनोमन ठरविले आणि त्यानुसार 'नवाकाळ&