चाकणच्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे
चाकणच्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे अखंडित समस्यांची शृंखला ; अधिकारी- कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा चाकण: मोबाईल , फॅक्स , इंटरनेट , कुरिअर आणि संवादाच्या इतर आधुनिक माध्यमांमुळे अडगळीत पडलेल्या पोस्ट कार्यालयांना समस्यांचा विळखा पडलेला असतानाच , सुविधांचा आभाव , कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा , अधिकाऱ्यांची अनास्था , यामुळे चाकण च्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. औद्योगिक वसाहत , छोटे , मोठे व्यावसायिक तसेच लगतच्या वाड्या वस्त्या व गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून चाकण येथून या टपाल कार्यालयाचा कारभार चालतो. विविध शासकीय कामांसह , या भागातील सर्व बँका , पतसंस्था यांचा कारभार तसेच दैनंदिन टपाल , ठेव योजना , बचत योजना , विमा योजना या सर्व कामांचा भार येथील टपाल कार्यालयावर आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे कामास विलंब होतो अशी खुद्द या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांची तक्रार आहे. मात्र या कार्यालयात कुठलेही तातडीचे काम घेवून येणाऱ्यांच्या अंगावर कर्मचारीवर्ग धावून येत असल्याच्या नागरिकां