पोस्ट्स

डिसेंबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*पोलीस दलातील ताण तणाव वाढतोय ..

इमेज
*पोलीस दलातील ताण तणाव वाढतोय .. *खाकी वर्दीची व्यथा ,लाचखोरीचा घट्ट विळखा चाकण : महेंद्र दुधवडे चाकण च्या पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने काही महिन्या पूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्मत्या केली, आपल्या वीस पंचवीस वर्षांच्या कारकीर्दीमध्ये आत्महत्यांच्या फासावर लटकलेले कित्येक मृतदेह हळहळ करीत फासावरुन काढीत नातेवाईकांच्या ताब्यात देणारे हे जिल्ह्यासह राज्यभरातील पोलीस दलातील अनेक सशक्त हात स्वतःचेच गळे घोटत असणे ही बाब संपूर्ण पोलीस प्रशासनाला शरमेने मान खाली करण्यास कारणीभूत ठरत असून पोलीस दलातील ताण तणाव व दिवसेंदिवस वाढती लाचखोरी या साठी उपाययोजना करण्याचे दिव्य गृह विभागाला पार करावे लागणार आहे. घरगुती ताण तणाव ,अतिरिक्त कामाचा बोजा,त्यातून पदरी येणारी व्यसनाधीनता ,वरिष्ठांच्या जा

चाकण चेस फेस्टिव्हल -2012

इमेज
जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेस चाकण मध्ये सुरुवात चाकण चेस फेस्टिव्हल -2012 चाकण:वार्ताहर चाकण अकादमी व एस.एस.सिकीलकर संस्थेच्या वतीने चाकण मध्ये पुणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी 'चाकण चेस फेस्टिव्हल -2012' या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांना आज (दि.13) पासून सुरुवात झाली. मीरा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांसाठी सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांचे पारितोषिक वितरण शुक्रवारी सायंकाळी येथेच पुण्याचे उपमहापौर दीपक मानकर व चाकण चे उपसरपंच साजिद सिकीलकर ,यांच्या हस्ते होणार आहे.या स्पर्धांचे औपचारिक उदघाटन पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुरेश गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी चाकण चे सरपंच काळूराम गोरे,उपसरपंच साजिद सिकीलकर,अस्लमभाई सिकीलकर, समीर सिकीलकर,अजित सिकीलकर,रामदास जाधव,संतोष साळुंके,प्रा.साहीर सिकीलकर,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे,जयवंत पिंगळे ,पुणे जिल्हा चेस असोशिएशनचे सचिव राजेंद्र कोंडे, मनोज स्वामी अल्पसंख्यांक

शरद पवारांना सर्वकल्याण ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून शुभेच्छा

इमेज
  शरद पवारांना सर्वकल्याण ज्ञानयज्ञाच्या माध्यमातून शुभेच्छा खेड तालुक्यात अनोखा उपक्रम चाकण: केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कडाचीवाडी येथे खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या साक्षीने सर्वकल्याण ज्ञानयज्ञ आयोजित करण्यात आला होता .शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने या यज्ञाच्या माध्यमातून 108 वेळा गायत्री मंत्रांचे पठाण करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी अनोखी प्रार्थना केली. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी कोंग्रेस चे खजिनदार प्रतापराव खांडेभराड ,खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शांताराम भोसले,नानासाहेब टाकळकर ,बाजार समितीचे माजी सभापती हिरामण अण्णा सातकर ,माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई मोहिते,पंचायत समितीच्या सभापती कल्पना गवा

प्रेमाच्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

इमेज
प्रेमाच्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीचा खून खून केल्यानंतर मृतदेह टाकला जाळून चाकण जवळील घटना चाकण शुक्रवारी (7 डिसेंबर 12) सकाळी तोंडात बोळा कोंबून युवकास जाळण्यात आलेल्या थरारक खुनाचा छडा चाकण पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत लावला असून ,अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.संपूर्ण पणे जळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या नातेवाईकांपर्यंत पोहचण्याचे मृतदेहाची ओळख पटविण्याचे आणि संशयीतांना बोलते करण्याचे दिव्य पोलिसांनी पार पाडीत पत्नी आणि प्रियकर या दोघांना आज(दि.12) गजाआड केले आहे. संतोष बबन जाधव (वय 33,सध्या रा,लेंडघर वस्ती,नाणेकर वाडी,चाकण मूळ रा.उदापूर,ता.जुन्नर जि.पुणे ) असे खून करण्यात आलेल्या पतीचे नाव असून त्याची

इंदू मिल च्या निर्णयाने समाधान :लक्ष्मण दुधवडे

इमेज
इंदू मिल च्या निर्णयाने समाधान :लक्ष्मण दुधवडे चाकण:वार्ताहर गेल्या अनेक दिवसां पासून गाजत असलेल्या इंदू मिलची जागा, डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी हस्तांतरित करण्याच्या मागणीला आज संसदेने मंजुरी दिल्याची बातमी वृत्त वाहिन्यांवरून प्रसारित होताच रिपाई व खेड तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या  कार्यकर्त्यांनी चाकण परिसरात आनंदोत्सव साजरा केला.खेड तालुका भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष लक्ष्मण दुधवडे (गुरुजी)येथील रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव जाधव,तालुकाध्यक्ष संतोष जाधव,चाकण शहराध्यक्ष अशोक गोतारणे ,युवक अध्यक्ष नितीन जगताप,राहुल गोतारणे,शेखर घोगरे,अभिजीत घोगरे,सतीश आगळे,प्रदीप गायकवाड, सुमित गायकवाड,अक्षय घोगरे,संजय गोतारणे,सचिन घोगरे,आदींनी या बाबत समाधान व्यक्त केले आहे.  ही जागा मिळविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह विविध आंबेडकरी संस्था संघटनांनी विशेष प्रयत्न केले होते. शासनाने समाजाच्या भावना लक्षात घेवून  या बाबतचा निर्णय घेतल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत असल्याचे दुधवडे (गुरुजी ) यांनी सांगितले. ----------------