चाकणच्या ऑटो हबचे चाक अडखळतेय व्हॅट परताव्याच्या मुद्द्यावर बडे उद्योग आक्रमक ऑटो हबच्या चाकापुढे मोदी शासनाचे काटे फोक्सवॅगनची दोन हजार कोटीची गुंतवणूक स्थगित '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''(अविनाश दुधवडे) राज्य शासनाचे दोलायमान धोरण आणि गुजरातच्या मोदी शासनाकडून निरनिराळ्या क्लुप्त्यांनी रस्त्यात टाकले जाणारे काटे यामुळे जिल्ह्याच्या इंडस्ट्रीयल बेल्टचे व प्राधान्याने चाकणच्या ऑटो हबचे चाक अडखळू लागले आहे. येथील एका बड्या जर्मन आटो कंपनीने येथील आपला विस्तार स्थगित केला असून अनेक बड्या उद्योगांनी कर सवलतींच्या गाजरामुळे मोदींच्या गुजरातची वाट धरण्याचा प्रयत्न सुरु केल्याची वास्तववादी चर्चा औद्योगिक वर्तुळात आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रात महिंदा अँड महिंदा, मसिर्डिज बेंझ, जनरल मोटर्स, फोक्सवॅगन,टाटा आदी अनेक बड्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. उद्योगांसाठीचे आकर्षित करणारे राज्य शासनाचे धोरण, पुण्या- मुंबई पासून जवळचा भाग, जागेची उपलब्धता, कच्चा -पक्का माल , कुशल अकुशल कामगारांची आणि दळणवळणाची उपलब्धता अशा अनेक कारणांनी उद्योगांनी या भागाची वाट धरली .फोक्सवॅगन सारख्या एकट्या जर्मन आटो कंपनीने 2008 मध्ये याभागात 3600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगत बहुचर्चित पोलो व अन्य कार चे उत्पादन चाकण मधील प्लांट मध्ये सुरु केले होते. महिंदा अँड महिंदा, मसिर्डिज बेंझ, यांनीही चाकण मधील आपल्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर वाहनांचे उत्पादन गेल्या दोन वर्षात सुरु केले आहे. लाखो कुशल ,अकुशल आणि अर्धकुशल कामगारांना येथे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या बड्या उद्योगांना पूरक अशा अनेक छोट्या कारखान्यांनाही कामाची संधी प्राप्त झाली. फोक्सवॅगनची सर्वाधिक म्हणजे 3 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. त्याखालोखाल बजाज 2 हजार कोटी रुपये. सुमारे 20 हजार अभियंते, कुशल मनुष्यबळाला चाकणमध्ये रोजगार. परिसरातील एकूण थेट रोजगार सुमारे दीड लाख. हे प्रमाण वाढण्याची शक्यता . अशी एकंदरीत परिस्थिती असताना मात्र राज्य शासनाकडून ऑटो कंपन्यांना देऊ केलेली व्हॅट परतावा सवलत बंद करण्यात आल्यामुळे सर्वच बड्या उद्योगांचे डोळे पांढरे झाले असून फोक्सवॅगन सारख्या बड्या कंपनीने येथील आपला विस्तारच बंद केला आहे. महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये प्रकल्प सुरु करण्याचा त्यांचा विचार असल्याचे उद्योग वर्तुळात बोलले जात आहे. गुजरात सरकारने देऊ केलेले कर सवलतींचे गाजर पाहून तोंडाला पाणी सुटलेले आणि कर न भरण्याची ,पळवाटा शोधण्याची सवय असणारे अनेक बडे बहुराष्ट्रीय प्रकल्प गुजरात मध्ये उत्पादन सुरु होई पर्यंतच येथे उत्पादन करण्याच्या मनस्थितीत असल्याचे उद्योग जगतातून उघडपणे बोलले जात आहे. गुजरातच्या सवलती पदरात पाडून घेण्यासाठी अनेक बड्या कंपन्या सरसावल्या असल्याचे वास्तव असून येथील आपल्या कंपन्यांचा विस्तार रोखणे हा त्याच व्युव्हरचनेचा भाग असल्याचे मानले जात आहे. व्हॅट (मूल्यवर्धित कर) परताव्यावरून बजाज ऑटो , महिंद्र अँड महिंद्र या कंपन्यांनीदेखील गांभीर्याने येथील गुंतवणुकीबाबत पुनर्विचार सुरु केला असून व्हॅट परताव्याचे घोंगडे भिजत पडल्यानेच फोक्सवॅगन कंपनीने चाकण प्रकल्पासाठी जाहीर केलेल्या आनखी दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस स्थगिती दिली असल्याचे संबंधित व्यवस्थापनाकडून समजते. राज्य शासनाचे दोलायमान धोरण आणि मोदी शासनाकडून या ऑटो हबच्या मार्गात सवलतींच्या रुपाने टाकले जाणारे काटे यामुळे आगामी काळात येथील औद्योगिक विकासाची गती मंदावली जाण्याची दाट शक्यता आहे. नवीन येणाऱ्या उद्योगांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असून मोठे उद्योग चाकण आणि महाराष्ट्राबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे . Avinash Dudhawade 9922457475 - 9765566908 chakanreporter@gmail.com
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
KHED | ठळक घडामोडी | Wednesday, 10 August 2022 | Highlights | PUNE LIVE
आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)
आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे) श निवार वाडा,पुणे पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण : पुणे पुणे जिल्ह्यातील तालुके : चौदा पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ : १५,६४३ चौ.कि.मी. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या : ५५,३२,५३२ हे पुणे ! शिवरायांनी याच पुण्यात बालपणी संस्करांचे व पराक्रमी धडे गिरविले. पेशवाईमध्ये याच पुण्याचे राजधानीचे स्थान भूषविले. पेशव्यांचे कर्तृत्वही फुलविले याच पुण्याने. असे हे पुणे ! लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी. थोर समाजसुधारक जोतिबा फुल्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यास सुरुवातही येथूनच झाली. या कार्याला प्रेरणाही या पुण्यातच मिळाली आणि…. विरोधही येथेच झाला. समाजपरिवर्तन, सुधारणेच्या कार्यात सर्वस्व झोकून देणाऱ्या अनेक समाजसुधारकांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. याच पुण्यातील सनातन्यांनी आगरकारांच्या हयातीतच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा करंटेपणाही दाखविला. असे हे पुणे ! टिळक व आगरकर असे दोन भिन्न विचार-प्रवाह येथेच निर्माण होतात; कधी हातात हात घालून आपली वाटचाल करतात तर कधी कायमच्याच दोन समांतर रेषा बनतात. गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी), महात्मा जोतिबा फुले, यां
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा