धारदार हत्याराने खून करून मृतदेह फेकला पाण्यात सिद्धेगव्हान येथील घटना चुलता आणि आजोबावर गुन्हा जमिनीच्या वादातून घडला थरारक प्रकार
-------------------------
जमिनीच्या वादातून खेड तालुक्यातील सिद्धेगव्हान येथे एकाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली. हत्ये नंतर मृतदेह नदीपात्रात फेकून देण्यात आला होता.आज(दि.5)सकाळी हा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. राजेश किसन जाधव (वय 30,रा.सिद्धेगव्हान ,ता.खेड) असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून खून झालेल्या राजेशची पत्नी अरुणा हिच्या फिर्यादी वरून चाकण पोलिसांनी राजेशचा चुलता सखाराम नानाभाऊ जाधव ,व आजोबा विठ्ठल काशिनाथ जाधव ( दोघे रां. सिद्धेगव्हान ,ता.खेड) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबतचे वृत्त असे की, राजेश सोमवारी (दि.4) दुपारी तीन वाजनेचे सुमारास बाहेर जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला तो पुन्हा घरी परतलाच नाही. घरातील मंडळींनी सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही.अखेर आज (दि.5) सकाळी सिद्धेगव्हान (ता.खेड) गावाच्या हद्दीत भीमा नदीच्या बंधाऱ्याजवळील पाण्यात राजेशचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत चाकण पोलिसांच्या पोलीस निरीक्षक सुशील कदम यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस उपनिरीक्षक मोहंडुळे , मनोज लोखंडे,आदींच्या पथकाने घटनास्थळी जावून पहाणी केली असता या बंधाऱ्यावरून जाणाऱ्या सिमेंटच्या रस्त्यावर रक्ताचे थारोळे दिसून आल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाली. राजेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याच्या डोक्यावर पाठीमागील बसून आणि हाताच्या पंजावर गंभीर वार झाल्याच्या खुणा आढळून आल्या .राजेशची पत्नी अरुणा हिने आपला चुलत सासरा आणि आजे सासरा यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.घटनेपूर्वी ते दोघे जवळील शेतात कुऱ्हाडीने झाडांच्या फांद्या तोडत असताना आपण पहिल्याचेही सांगितले आहे . जमिनीच्या वादातून अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद धूमसत होता अशी फिर्याद दिली असून चाकण पोलिसांनी फिर्यादीवरून दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत . .....अविनाश दुधवडे ९९२२४५७४७५
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा