तेल कंपन्यांकडून सांगण्यात येणारी माहिती तपासा
चाकण मध्ये रामदास आठवले यांची मागणी
आणखी साडेतीन रुपये दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन

चाकण:(अविनाश दुधवडे)
 पेट्रोलच्या दोन रुपये या अत्यल्प दरकपातीवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार रामदास आठवले यांनी  तीव्र नापसंती व्यक्त करताना आणखी साडेतीन रुपयांची
दरवाढ मागे घेण्याची मागणी करीत पेट्रोल दरासंदर्भात तेल कंपन्या सांगत असलेली माहिती कसून तपासली पाहिजे अशी मागणी आज(दि.3) चाकण (ता.खेड)येथे केली.
  चाकण मध्ये कार्यक्रमासाठी आले असताना रामदास आठवले यांनी शासनाच्या आडमुठ्या भूमिकेवर कडाडून टीका केली. या बाबत आठवले यांनी पुढे  सांगितले की,
पेट्रोल दरवाढीचा निर्णय केंद सरकार घेत नाही. हा निर्णय पेट्रोल कंपन्या घेतात,' असे नेहमीचेच कारण पुढे करीत  काँग्रेसने पेट्रोल दरवाढप्रकरणी हात झटकले आहेत .
'पेट्रोलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांशी सुसंगत ठेवण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे, त्यामुळे कंपन्या पेट्रोलचे भाव स्वत: ठरवितात, त्याच्याशी सरकारचा
 संबंध नाही अशा पद्धतीने जनतेची दिशाभूल केंद्र शासन करीत आहे. तेल कंपन्या तोट्यात आहेत, अशी सबब सरकार सांगते, ती संपूर्ण खोटी आहे.सरकार सध्या सर्व
स्तरावर अपयशी ठरले आहे. सरकारचे महागाईवर नियंत्रण राहिलेले नाही.
इतर उपाययोजना करण्याऐवजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव वाढल्याचे वर्षानूवर्षे हेच कारण पुढे करुन आम आदमीचा विश्वासघात केलेला आहे. पेट्रोल दरवाढीमुळे
महागाईत वाढ होऊन त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार. एकूण दोन रुपये दर वाढीस आमचा विरोध नाही त्यामुळे शासनाने आणखी साडेतीन रुपयांची दरवाढ
मागे घ्यावी अशी मागणी करीत आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांच्या समवेत रिपब्लिकन पक्षाचे पुणे
जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे ,उपाध्यक्ष बबनराव जाधव,वसंत चव्हाण,खेड तालुकाध्यक्ष संतोष जाधव,चाकण शहराध्यक्ष अशोक गोतारणे,युवा अध्यक्ष नितीन जगताप,
विद्यार्थी संसदेचे खेड तालुकाध्यक्ष सतीश आगळे,सुनील गोतारणे ,बाळासाहेब भागवत ,प्रदीप गायकवाड,संतोष डोळस,विजय भोंडवे, अक्षय घोगरे,आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 अविनाश दुधवडे ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)