चाकणच्या पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरूच अद्यापही दिवसाआड पाणी बिघडानंतर सलग तीन-तीन दिवस कोरडे चाकण शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने आज(दि.5) सलग तिसऱ्या दिवशी अनेक प्रभागांमध्ये पाण्याचा एकही थेंब नळाला आला नाही . घरांतील उरले सुरले पाणीसाठेही पूर्णपणे संपुष्टात आल्याने चाकण करांची पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण झाली. किरकोळ कारणाने चाकण मध्ये बऱ्याचदा नळांना एकही थेंब पाणी येत नसल्याने घरांतील उरले सुरले पाणीसाठेही पूर्णपणे संपुष्टात येत असून चाकण करांची चांगलीच दैना होत आहे. एमआयडीसीच्या त्या पाण्याचा स्रोत सुरु झाल्या नंतर ही समस्या निकाली निघेल असे वाटत असताना चाकण करांच्या समस्या मात्र जैसे थे आहेत. काही महिन्यांपूर्वी वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने चाकणला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या भरता न आल्याने कित्येकदा पाणी पुरवठा होऊ शकत नव्हता ,आता चाकण परिसर जवळपास भारनियमन मुक्त झाल्याने ती समस्या निकाली निघाली आहे.मात्र चाकणकरांना आजही पूर्ण दाबाने आणि दररोज पाणी पुरवठा होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. श्रेया साठी धडपडणारे कुठे गेले? 'चाकण औद्योगिक वसाहत व लगतची 19 गावे ' या भामा आसखेड धरणावरून प्रस्तावित असलेल्या पाणी पुरवठा योजनेतून चाकण शहरासाठीचा पाणी पुरवठा आता प्रत्यक्षात सुरु करण्यात आला आहे .या योजनेतून चाकण साठी आता दररोज 12 लाख लिटर पाणी मिळणार आहे. ही पाणीपुरवठा योजना सुरू झाल्याचा चांगलाच गवगवा झाला. श्रेय घेण्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी ,ग्रामपंचायतीचे कारभारी आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाजूलाच पण अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचीच चढाओढही झाली. पण त्या 12 लाख लिटर्स पाण्यावर 2 लाखांच्या पुढे लोकसंख्या गेलेल्या चाकणला पुरेल एवढा पाणी पुरवठा होणार का? श्रेयासाठी भांडणारे अधिक पाण्यासाठी भांडणार का? हा प्रश्न अध्यापही निरुतरीत आहे . 52 लाख लिटर्स पाणीही अपुरे: 'चाकण औद्योगिक वसाहत व लगतची 19 गावे ' या भामा आसखेड धरणावरून प्रस्तावित असलेल्या पाणी पुरवठा योजनेचा स्रोत चाकण शहरासाठी सुद्धा गृहीत धरण्यात आला होता .मात्र या बाबतच्या कार्यवाहीचा मेळ गेल्या काही वर्षांमध्ये बसलाच नव्हता .ग्रामपंचायतीचे सरपंच काळूराम गोरे, उपसरपंच साजिद सिकीलकर, ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी,सदस्य दतात्रेय बिरदवडे, अशोक बिरदवडे, प्रीतम परदेशी, सुधीर वाघ, अमोल घोगरे, व त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्रमक पणे या पाण्याची मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि चाकण इंडस्ट्रीज असोशिएन कडे केली करीत यासाठी आवश्यक साडेआठ लाखांची रक्कम एमजेपी कडे सुपूर्त केली होती , याबाबत चाकण ग्रामपंचायतीने येथील नागरिकांसाठी 15 लाख लिटर्स पाण्याची मागणी केली होती .मात्र एमजेपीने चाकण करांना 12 लाख लिटर पाणी देण्याचे कबुल केले. सध्या ग्राम पंचायत चाकण करांना दिवसाआड सुमारे 40 लाख लिटर्स पाणी देऊ करीत असली तरी ते अपूर्ण पडत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी 12 लाख लिटर्स पाण्याची उपलब्धता करून देण्यास मान्यता दिली आणि ग्रामपंचायतीने या बाबतचा पाठपुरावा केला होता. या प्रती हजार लिटर्स पाण्या साठी चाकण ग्रामपंचायतीला पर्यानाने नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला या पाण्याचे आठ रुपये अदा कारावे लागणार आहेत . या पाण्या मुळे चाकण च्या काही प्रभागातील पाणीपुरवठा संपूर्ण पणे या योजनेतून होणार असल्याने वाकी केटी बांधार्यावरील जुन्या पाणी पुरवठा योजने वरील भार कमी होणार असून अन्य ठिकाणी पूर्ण दाबाने नियमित पाणी पुरवठा करता येणार आहे.पाणी समस्येची तीव्रता या मुळे कमी होणार असल्याचे सांगण्यात येत होते . पंधरा दिवसांपूर्वी 'चाकण औद्योगिक वसाहत व लगतची 19 गावे ' या भामा आसखेड धरणावरून प्रस्तावित असलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी येथील नागरिकांपर्यंत पोहोचले. पाणी पोहोचताच तथाकथित पुढार्यांची श्रेय घेण्यासाठी चढाओढ झाली. कुणीही श्रेय देत नाही हे पाहून प्रसार माध्यमांनी तरी आपली बाजु रेटून न्यावी यासाठी आळवणी झाली,हमरीतुमरी झाली .पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप - प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या. पण पंधरवडा लोटूनही चाकण च्या सर्व प्रभागात पूर्ण दाबाने पाणी जाऊ शकले नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे ठराविक प्रभागांच्या पुढे पाणी जाऊ शकलेले नाही अशी अनेक प्रभागातील नागरिकांची तक्रार आहे .श्रेया साठी धडपडणारे आता मात्र अज्ञात वासात गेले आहेत. ---------------------------------------- अविनाश दुधवडे, ९९२२४५७४७५
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
KHED | ठळक घडामोडी | Wednesday, 10 August 2022 | Highlights | PUNE LIVE
आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)
आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे) श निवार वाडा,पुणे पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण : पुणे पुणे जिल्ह्यातील तालुके : चौदा पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ : १५,६४३ चौ.कि.मी. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या : ५५,३२,५३२ हे पुणे ! शिवरायांनी याच पुण्यात बालपणी संस्करांचे व पराक्रमी धडे गिरविले. पेशवाईमध्ये याच पुण्याचे राजधानीचे स्थान भूषविले. पेशव्यांचे कर्तृत्वही फुलविले याच पुण्याने. असे हे पुणे ! लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी. थोर समाजसुधारक जोतिबा फुल्यांच्या समाजपरिवर्तनाच्या कार्यास सुरुवातही येथूनच झाली. या कार्याला प्रेरणाही या पुण्यातच मिळाली आणि…. विरोधही येथेच झाला. समाजपरिवर्तन, सुधारणेच्या कार्यात सर्वस्व झोकून देणाऱ्या अनेक समाजसुधारकांचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. याच पुण्यातील सनातन्यांनी आगरकारांच्या हयातीतच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा करंटेपणाही दाखविला. असे हे पुणे ! टिळक व आगरकर असे दोन भिन्न विचार-प्रवाह येथेच निर्माण होतात; कधी हातात हात घालून आपली वाटचाल करतात तर कधी कायमच्याच दोन समांतर रेषा बनतात. गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी), महात्मा जोतिबा फुले, यां
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा