पोस्ट्स

जून, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉ.नंदकुमार शहा यांचे निधन

इमेज
डॉ.नंदकुमार शहा यांचे निधन चाकण: डॉ.नंदकुमार शहा   येथील विधी (लाॅ कॉलेज ) महाविद्यालयाचे उपाध्यक्ष व चाकण रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नंदकुमार हिराचंद शहा (वय ७२ ) यांचे आज (दि.२८) अल्पशा आजाराने निधन झाले. डॉ. शहा त्यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आहे. मात्र महाविद्यालयीन व  वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. शहा यांनी चाकण येथे वैद्यकीय सेवा सुरु केली. गेल्या अनेक वर्षांपासून ते चाकण येथे वैद्यकीय व्यवसाय करत होते. चाकण पंचक्रोशीतील व  आसपासच्या बहुसंख्य गावातील रुग्ण त्यांच्यकडे येत असत. उत्कृष्ट मित्र   व  मार्गदर्शक म्हणूनही त्यांचा लौकीक होता या परिसरात त्यांचा अफाट मित्र परिवार होता.  त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हळहळ व्यक्त व्यक्त करीत सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व चाकण परिसरातील जनतेचे लोंढे त्यांच्या निवासस्थानी सकाळीच पोहचले. अनेक सामाजिक संस्था संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. त्यांच्या पश्चात पत्नी ,  २ मुले  , सुना , भाऊ , नातवंडे असा मोठा परिवार आहे. डॉ.बाहुबली शहा यांचे ते बंधू होत. चाकणच्या चक्रेश्वर मंदिर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्का

सोशल मिडिया शाप कि वरदान ?

इमेज
सोशल मिडिया शाप कि वरदान  ? महापुरुषांच्या फेसबुक वरील अवमानकारक पोस्ट नंतर चाकण मध्ये फोडण्यात आलेली एसटी बस   ताब्यात घेण्यात आलेले आंदोलनाचे प्रमुख  चाकण:  अविनाश दुधवडे     सोशल नेटवर्किंगच्या प्रभावी माध्यमामुळे अनेकजण इंटरनेटच्या सतत संपर्कात राहू लागली आहेत. माहिती तंत्रज्ञानातील बदलामुळे मोबाईलमध्येही अनेक बदल झाले आहेत. सोशल नेटवर्किंगच्या सेवा मोबाईलमध्ये उपलब्ध असल्यामुळे ,  ग्रामीण भागात  मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे. क्षणाक्षणाला आपल्या भोवतालच्या घटना वेगवेगळी मोबाईल वरून काढलेली आणि मोबाईल वर शेअर केलेली छायाचित्रे , वैयक्तिक माहिती , अशी इत्यंभूत माहिती ग्रामीण भागातही फेसबुक ,  व्हॉट्स अप  , ट्वीटर आदी. सारख्या सोशल नेटवर्किंग वर हजारो  –लाखो  युवक मंडळी अपडेट करताना सर्रास  दिसत आहेत. मात्र एखाद्या समाज कंटकाच्या हातात हे माध्यम सापडल्यानंतर त्याचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो याचा  मागील आठवडाभरात पुण्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना अनुभव आला आहे. यापूर्वी अशा सोशल साईट वरून मुजफ्फरनगर भागात वैगरे दंगली उसळल्याचे

खेड तालुक्यातील खून प्रकरणात मुंबईच्या आरोपीस जन्मठेप

इमेज
खेड तालुक्यातील खून प्रकरणात  मुंबईच्या  आरोपीस जन्मठेप तीन वर्षांपूर्वीच्या आव्हाट च्या  खूना त सत्र न्यायालयाचा  निकाल  पोलिसांच्या श्वानाने केला होता आरोपीकडे निर्देश गुन्हे शोधक श्वान ‘राणी’ ची महत्वाची भूमिका चाकण:     पोलिसांनी मांडलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावणा-या पुण्याच्या सत्र न्यायालयाने पोलिसांच्या श्वानाने दिलेल्या पुराव्यावरही शिक्कामोर्तब करून खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली  ,  त्यामुळे खेड तालुक्यातील आव्हाट गावी तीन वर्षापूर्वी मुलगा गमावलेल्या ६५ वर्षांच्या वृद्ध मातेला न्याय मिळाला आहे. या क्रूर खून खटल्यात वृद्ध मातेच्या न भिता देण्यात आलेल्या निर्भय साक्षी सोबतच पोलिसांच्या गुन्हे शोध क   श्वान पथकातील  ‘राणी’  श्वानाने काढलेला माग व तपासणीवेळी आरोपीकडे थेट केलेल्या निर्देशाने या खटल्यात महत्वाची भूमिका बजावली.   मित्राच्या मावसबहिणीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाची वाईट नजर असल्याच्या संशयावरून मैनुद्दीन इमामुद्दीन शेख (२३ ,  रा. आव्हाट ,  शेरेवाडी ,  ता. खेड ,  मूळ रा.वडाळा मुंबई) याने १७ एप्रिल २०११ रोजी धर्मा खंडू बु

भूमिपुत्रांच्या रोजगाराची जखम अजून भळभळतीच ...

इमेज
भूमिपुत्रांच्या  रोजगाराची जखम अजून भळभळतीच ... ८० टक्के स्थानिकांच्या रोजगाराचा कायदा पायदळी  चाकण एमआयडीसीतील प्रकार चाकण: विमानतळ ,  सेझ ,  एमआयडीसी पासून शासनाच्या विविध विकास प्रकल्पांसाठी भूमिपुत्रांनी जमीन द्यावी ,  असे आवाहन राजकीय नेते आणि प्रशासनातर्फे खेड तालुक्यातील जनतेला नेहमीच केले जाते ,  हजारो हेक्टर जमिनी अशाच पद्धतीने भुलवून ताब्यातही घेण्यात आल्या आहेत. मात्र येथे  येणाऱ्या प्रकल्पातून व्यवसाय -रोजगार मिळेल या आशेवर दिलेल्या जमिनींबाबतचा स्थानिकांचा अनुभव अतिशय दारूण आहे. लघु ,  मध्यम व मोठ्या अशा सर्वच उद्योगांत ८० टक्‍के स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यात प्राधान्य द्यावे यासाठी राज्य सरकारने आदेश जारी केले असले तरी त्यावर देखरेख ठेवणारी यंत्रणाच भ्रष्टाचारात नखशिखांत बुडाली असल्याने शासनाचा तो आदेश अक्षरशः अनेक धनाढ्य कारखानदारांनी धुडकावून लावला आहे. राजकीय नेत्यांना या एमआयडीसीतील विविध ठेके मिळालेले असल्याने त्यांना याकडे लक्ष देण्यात अजिबात स्वारस्य नाही. अशा स्थितीत भविष्यात शासन आग्रही असलेल्या आणखी विकास प्रकल्पांसाठी भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी क