पोस्ट्स

जुलै, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रक्तचंदनाची तस्करी करणारा बडा एजंट जाळ्यात

इमेज
रक्तचंदनाची तस्करी करणारा बडा एजंट जाळ्यात ग्रामीण पोलीस व नवी मुंबई कनेक्शन होणार उघड? पाळेमुळे खोदण्याची गरज चाकण: परदेशात पाठविण्यापूर्वी चाकण जवळ वाकी बुद्रुक (ता. खेड) येथील गोदामात शासनाने संरक्षित केलेल्या रक्तचंदनाचा बेकायदा साठा केल्याप्रकरणी फरारी असलेला व चाकण पोलिसांना हवा असलेल्या मुख्य आरोपी दीपक शरद जरे (वय 40, रा. नवीमुंबई) यास तब्बल सात महिन्यांनी ताब्यात घेण्यात आले आहे. चंदन तस्करी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल असलेला व या गोरख धंद्यातील एजंट मानला जाणारा दीपक जरे हा चंदन तस्करीतला मोठा मासा असून त्याच्या जाळ्यात येण्याने रक्तचंदनाच्या तस्करीचे लागेबांधे संघटित आंतरराष्ट्रीय माफिया टोळ्यांशी आहेत का , ग्रामीण पोलीस दल आणि नवी मुंबईचे यात नेमके कुठले कनेक्शन आहे, अशी बरीच धक्कादायक माहिती खरीखुरी पाळेमुळे खोदल्यास उघड होण्याची शक्यता आहे. मुंबई येथे पाठविण्या पूर्वी चाकण जवळ वाकी बुद्रुक (ता.खेड) येथे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेला कर्नाटक - आंध्रातून आणण्यात आलेला साडेसतराशे घनमीटर ,सत्तावीस टन वजनाचा व अडीच कोटी रुपये किंमतीचा शा

खराबवाडीत एलपीजी गॅस टॅंकरचा विचित्र अपघात

इमेज
खराबवाडीत एलपीजी गॅस टॅंकरचा विचित्र अपघात एक ठार; एक जखमी प्रवाहित तारा तुटल्याने पाच तास वीज खंडित सुदैवाने टळला मोठा अनर्थ चाकण:अविनाश दुधवडे  चाकण - तळेगाव राज्य मार्गावर खराबवाडी (ता.खेड) येथे आज (दि.10) सकाळी सातच्या सुमारास शिक्रापूर कडे जाणाऱ्या भारत गॅसच्या एलपीजी गॅस टॅंकरची  उभ्या टेम्पोला जोरात धडक बसून झालेल्या अपघातात एक जण ठार , तर एक जण जखमी झाला. गॅस टॅंकरची धडक इतकी जबरदस्त होती कि, टेम्पोला धडकल्या नंतर तो रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या विद्युत खांबाला वाकवून पुढे एका घराच्या भिंतीवर आदळला. मोठा अपघात होऊनही केवळ सुदैवानेच टॅंकरचे व्हॉल्व्ह शाबूत राहिल्यानेच गॅस गळती झाली नाही व मोठा अनर्थ टळला. मात्र अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक जवळपास सहा तास ठप्प झाली होती.     गयाराम मोरया (वय 26 ,सध्या रा. खराबवाडी, मूळ रा.उत्तरप्रदेश) असे या अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नाव असून गॅस टॅंकर चालक यादव (पूर्ण नाव समजले नाही) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या बाबतचे वृत्त असे कि, चाकण तळेगाव रस्त्यावर खराबवाडी (ता.खेड

बजाज ऑटो कंपनीच्या आंदोलनास हजारो कामगारांचा पाठींबा

इमेज
बजाज ऑटो कंपनीच्या आंदोलनास हजारो कामगारांचा पाठींबा  चाकण मधील मेळाव्यास भव्य प्रतिसाद   कोळसे पाटील व खा. आढळरावांची बजाजवर तीव्र टीका  चाकण:अविनाश दुधवडे   चाकण औद्योगिक क्षेत्रातील बजाज ऑटो कंपनीच्या आंदोलनाला आज (दि.7) चाकण एमआयडीसी मधील विविध कामगार संघटनांनी , खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील आदींनी जाहीर पाठींबा दिला. चाकण येथील विष्णू लक्ष्मी मंगल कार्यालय येथे श्रमिक एकता महासंघाच्या वतीने  झालेल्या मेळाव्यात खा.आढळराव ,कोळसे पाटील यांनी बजाज ऑटो कंपनीचे व्यवस्थापन व मालकांच्या च्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध केला.    बजाज ऑटो कंपनीच्या कामगारांनी गेल्या तेरा दिवसांपासून  (दि.25 जून ) 'काम बंद' आंदोलन सुरु केले असून , 14 कामगारांची सुरु असलेली चौकशी थांबवावी ,बडतर्फी, चौकशी, बदल्यांची कारवाई , मागे घेण्यात यावी ,कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे समान वेतन मिळावे , वेतनवाढ करार करावा आदी मागण्यांसाठी आकुर्डी येथील मुख्यालयात सुरु असलेल्या आंदोलनात आज चाकण भागातील विविध कामगार संघटनांनी सहभाग घेतला आहे. यावेळ

'हिमालयीन त्सुनामी' मधून ते सुखरूप

इमेज
केवळ नशीब बलवत्तर होते म्हणूनच ....  केदारनाथहून परतलेल्या गोरे कुटुंबियांची भावना   'हिमालयीन त्सुनामी' मधून ते सुखरूप  चाकण: अविनाश दुधवडे   उत्तराखंड येथे केदारनाथ दर्शनासाठी गेलेले व ढगफुटी व महापुरात तब्बल पाच दिवस अडकलेले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोपाना गोरे व त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक हे चाकण व  पुण्यातील यात्रेकरू सुखरूप घरी परतले आहेत.  उत्तराखंड मधील जल प्रलया नंतर त्यांच्या नातेवाइकांची चिंता गेल्या काही दिवसांपासून वाढली होती.  शिव-गौरी ट्रॅव्हल्स यात्रा कंपनीच्या वतीने एकाच कुटुंबातील नातेवाईक मंडळी (चौदा जन) चारधाम यात्रेसाठी गेले होते. सर्वच जन सुखरूप घरी परतल्याने सर्वांच्याच जीवात जीव आला आहे.    केदारनाथपासून अलीकडे काही अंतरावर असलेल्या जंगलपट्टी ,गौरीकुंड येथे हे सर्वच जन प्रलयाच्या वेळी आले होते .  पुढे जाण्याच्या तयारीत असतानाच घडलेल्या प्रकारानंतर रस्ते ,पूल वाहून गेल्याने हे सर्वच जन येथे अडकून पडले होते. त्यांच्या सोबत असणारे महाराष्ट्रातील अनेक जन आधीच येथून निघाल्याने हृषीकेश-रुद्रप्रयाग रस्त्यावर कीर्तिनगर पर