पालेभाज्यांची आवक वाढून भावात मोठी घसरण
कांद्याची आवक वाढून भावात किंचीतशी वाढ
चाकण बाजारभाव
चाकण: अविनाश दुधवडे
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड मध्ये फळभाज्या आवक स्थिर राहूनही भावात काहीशी घट झाली .पालेभाज्यांची आवक
वाढून भावात मोठी घसरण झाली . किरकोळ बाजारात कोथिंबीरीची आवक वाढून भाव अक्षरश कोसळले .किरकोळ बाजारात कोथिंबीरीला एका जुडीला अवघा एक रुपयाचा
भाव मिळाला. कांद्याची आवक वाढून भावातही शंभर रुपयांची वाढ झाली ;तर जनावरांच्या बाजारात गाई ,बैल, शेळ्या मेंढ्यांची संख्या स्थिर राहिली.
कांद्याची एकूण आवक 600 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 70 क्विंटलने वाढली व कमाल भावात 100 रुपयांची
वाढ झाली . कांद्याचे कमालभाव 700 रुपयांवरून 800 रुपयांवर स्थिरावले . बटाट्याची एकूण आवक 1100 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही
आवक 120 क्विंटल ने वाढली . बटाट्याचे कमाल भाव मात्र 1 हजार 600 रुपयां वरून 1 हजार 700 रुपयांवर स्थिरावले.
जळगाव भुईमुग शेंगांची आवक मागील आठवड्या इतकीच 10 क्विंटल झाली व कमाल भाव 100 रुपयांनी घटले .या शेंगांचे भाव 4600 रुपयांवरून 4500
रुपयांवर स्थिरावले . बंदूक भुईमुग शेंगांची आवकही मागील आठवड्या इतकीच 5 क्विंटल झाली , व कमालभाव मागील आठवड्यापेक्षा 500 रुपयांनी वाढले .
या शेंगांचे कमालभाव 5000 रुपयांवरून 5500 रुपयांवर पोहचले .लसणाची या आठवड्यातही 4 क्विंटल आवक झाली , व भाव मात्र 1600 रुपयांवरून
1500 रुपयांवर स्थिरावले. हिरव्या मिरचीची आवक 320 क्विंटल झाली गेल्या आठवड्या पेक्षा ही आवक दुपटीने म्हणजे 160 क्विंटलने घटून भावात किंचीतशी
वाढ झाली .या मिरचीला 160 ते 240 रुपये इतका कमाल भाव मिळाला.
शेती मालाची एकूण आवक व मिळालेले भाव पुढील प्रमाणे :
कांदा : एकूण आवक 600 क्विंटल झाली , भाव क्रमांक 1 -800 रुपये , भाव क्रमांक 2 - 700 रुपये, भाव क्रमांक 3- 350 रुपये
बटाटा :एकूण आवक 1100 क्विंटल झाली ,भाव क्रमांक 1- 1700 रुपये , भाव क्रमांक 2 - 1600 रुपये , भाव क्रमांक 3 - 1500 रुपये,
फळभाज्या :
फळभाज्यांची एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
टोम्याटो (850 पेट्या) 900 ते 150 रुपये , कोबी ( 270 पोती) 40 ते 60 रुपये, फ्लॉवर (180 पोती) 70 ते 100 रुपये,
वांगी (47 पोती) 100 ते 160 रुपये, भेंडी ( 55 पोती ) 180 ते 230 रुपये, दोडकी(85 पोती) 200 ते 250 रुपये,
कारली (90 पोती) 200 ते 250 रुपये, काकडी ( 50 पोती) 60 ते 100 पोती, फारशी (25 पोती )200 ते 280 रुपये ,
गवार (20 पोती) 280 ते 380, वाटाणा (300 पोती ) 300 ते 350 रुपये ,चवळी व शेवग्याची काहीही आवक नाही .
पालेभाज्या :
पालेभाज्यांची आवक जुड्यांमध्ये व प्रतीशेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -
मेथी: एकूण आवक 12 हजार जुड्या (300 ते 50 रुपये ),
कोथिंबीर :एकूण आवक 15 हजार जुड्या (200 ते 400 रुपये ),
शेपू : एकूण आवक 11 हजार जुड्या (200 ते 300रुपये ),
पालक : एकूण आवक 5 हजार 500 जुड्या (200 ते 300 रुपये ).
जनावरे :
चाकण मधील जनावरांच्या बाजारात 55 जर्शी गाईं पैकी 35 गाईंची विक्री होऊन 10 हजार रुपयांपासून 40 हजार
रुपयां पर्यंत भाव मिळाले . 205 बैलांपैकी 125 बैलांची विक्री झाली व 10 हजार रुपयांपासून 25 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले
95 म्हशींपैकी 55 म्हशींची विक्री होऊन 10 हजार रुपयांपासून 40 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले , 2 हजार 580 शेळ्या मेंढ्या पैकी
1 हजार 800 शेळ्या मेंढ्याची विक्री होऊन 1000 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले. जनावरांच्या बाजारामध्ये एकूण 66 लाख रुपयांची
उलाढाल झाली,तर चाकण च्या बाजारात एकूण 1 कोटी 37 लाख 50 हजार रुपयांची उलाढाल झाली.
-------------------
*चाकण बाजार विशेष *
पालेभाज्यांची आवक वाढून भावात घसरण
फळभाज्या आवक स्थिर भावात काहीशी घट
किरकोळ बाजारात कोथिंबीर जुडी एक रुपयाला
चवळी व शेवग्याची काहीही आवक नाही
कांद्याचे कमालभाव 800 रुपये प्रती क्विंटल
एकूण उलाढाल 1 कोटी 37 लाख 50 हजार .
----------------------------------------------
Avinash Laxman Dudhawade chakan , (pune) 9922457475

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा