नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव |
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण |
आ.दिलीप मोहिते |
चाकण व राजगुरुनगरला येत्या दोन महिन्यात नगरपालिकची शक्यता
प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांसमोर
चाकण:अविनाश दुधवडे
मंत्रालयाला लागलेल्या आगीत खाक झालेला चाकण नगरपालिकेचा प्रस्ताव जळालेल्या कागद पत्रांचे पुनर्गठन कार्यक्रमांतर्गत मंत्रालयाने जिल्हाधिकारी
कार्यालयाकडून विभागीय आयुक्तां मार्फत मागवून घेतला होता. अन्य बाबींच्या पूर्ततेनंतर पुन्हा मागविण्यात आलेला हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी
मुख्यमंत्र्यांसमोर मंगळवारी (दि.31) दाखल करण्यात आला आहे . तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या कालखंडातील फायलींचा निपटारा बघता माझ्या
मुख्यमंत्रिपदाच्या कालखंडात सर्वाधिक फायली मी निकालात काढल्या , असे ठामपणे सांगणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या अंतिम मंजुरीसाठी
किती वेळ लावणार या कडे चाकण करांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्राचे नगरविकास राज्य मंत्री भास्कर जाधव यांनी याबाबत सांगितले कि, चाकण आणि राजगुरुनगरला येत्या महिनाभरात नगरपालिका करण्याचा आमचा पर्यंत आहे.मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या नगर विकास खात्याच्या दालनात सर्वप्रथम आग लागल्याने चाकण नगरपालिकेचा नगर
विकास विभागाच्या उपसचिवां कडून स्वाक्षरी झालेला प्रस्ताव याच विभागाच्या सचिवांच्या कार्यालयात मंजुरीसाठी असताना जळून खाक झाला होता.
त्यानंतर मंत्रालयातून प्राप्त झालेल्या जळालेल्या कागद पत्रांचे पुनर्गठन कार्यक्रमांतर्गत पुन्हा यातील सर्व कागदपत्रांची जुळवणी
जिल्हाधिकारी कार्यालय, चाकण ग्रामपंचायत यांच्या कडून करून हा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत 10 जुलै 12 रोजी (पत्र क्र. नपा/4/आर आर
/67/2012) पाठविण्यात आला होता. विभागीय आयुक्त कार्यालयातील या विभागाचे तहसीलदार नारायण शेळकंदे यांनीही यास दुजोरा दिला होता.
सर्व कागद पत्रांचे पुन्हा पुनर्गठन झाल्या नंतर नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मन्नुकुमार श्रीवास्तव यांनी चाकण नगरपालिके चा हा प्रस्ताव
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अभिप्राय (प्रस्ताव क्र- एमयूपी 2012/प्र.क्र.65/ना वी 19) देऊन पाठविला आहे.राजगुरुनगर नगरपालिकेसाठीचा
प्रस्तावही ( प्रस्ताव क्र- एमयूपी 2012/प्र.क्र.66/ना वी 19) पाठविण्यात आल्याचे मन्नुकुमार श्रीवास्तव यांनी चाकणमधील कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते निलेश
कड पाटील यांच्या शिष्ट मंडळाला सांगितले.
दरम्यान तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या कालखंडातील फायलींचा निपटारा बघता माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कालखंडात सर्वाधिक फायली मी निकालात
काढल्या , असे ठामपणे सांगणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चाकण करांचे लक्ष लागलेल्या यानगरपालिकेच्या अंतिम मंजुरीसाठी किती वेळ लावणार
या कडे चाकण करांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेनंतर हा प्रस्ताव विधी व न्याय विभागात पाठविण्यात येणार असून
तदनंतर याबाबतची अंमलबजावणी होणार आहे.
शनिवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार: आ. दिलीप मोहिते
चाकण आणि राजगुरूनगर शहरांमध्ये येत्या दोन महिन्यांमध्ये केंव्हाही नगरपालिका होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची येत्या
शनिवारी भेट घेण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही चाकण आणि राजगुरुनगर मध्ये नगरपालिका असावी अशी आग्रही भूमिका
आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत अशी माहिती खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी दिली.
--------------------------------
Chakan: Avinash Dudhawade, 9922457475
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा