ग्रामीण भागात सोशल नेटवर्किंगचा मोबाईल वरून सर्वाधिक वापर 

 तासन तास वापर करताहेत हजारोयुवक              चाकण : (अविनाश  दुधवडे )

इंटरनेट क्षेत्रातील बदलामुळे जगभरातील कोणतीही माहिती एका सेकंदात उपलब्ध होत असल्याचे सर्वश्रुत आहेच.गेल्या काही वर्षांपासून सोशल नेटवर्किंगचा वापर शहरी युवा
पिढीमध्ये प्रमाणेच ग्रामीण युवकांमधेही  मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. मोबाईल सारख्या माध्यमातून तासंतास सोशल नेटवर्किंगचा वापर करणारे हजारो युवक
ग्रामीण भागातही पहावयास मिळत आहेत.या वापरामागे विविध कारणेही आहेत. यामुळे अपडेट राहायला मदत होते. शिवाय, नवनवीन माहिती मिळण्यास मदत होतेच
मात्र आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठ व मित्रांशी अनोख्या संवादाचे माध्यम मिळाल्याचा विशेष आनंद ग्रामीण युवकांमध्ये पहावयास मिळत आहे.

 सोशल नेटवर्किंगच्या प्रभावी माध्यमामुळे अनेकजण इंटरनेटच्या सतत संपर्कात राहतात. माहिती तंत्रज्ञानातील बदलामुळे मोबाईलमध्येही अनेक बदल झाले आहेत.
सोशल नेटवर्किंगच्या सेवा मोबाईलमध्ये उपलब्ध असल्यामुळे, ग्रामीण भागात  मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे.क्षणाक्षणाला आपल्या भोवतालच्या
घटना वेगवेगळी मोबाईल वरून काढलेली छायाचित्रे वैयक्तिक माहिती,अशी इत्यंभूत माहिती चाकण सारख्या भागात फेसबुक सारख्या  सोशल नेटवर्किंग वर हजारो युवक
मंडळी अपडेट करताना सध्या दिसत आहेत.
  सोशल नेटवर्किंगचा वापर युवकांमध्ये एवढा वाढला आहे, की अनेक जण तासन्‌ तास आपला वेळ इंटरनेटवर घालवताना दिसतात. एक तास, एक दिवस जर इंटरनेटची
सेवा कोलमडली तर काय होईल? याचा विचार न केलेलाच बरा इतक्या टोकाला ही परिस्थती पोहोचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . अनेक जण फेसबुकवर पहाटेपासून
ते रात्री झोपेपर्यंत अपडेट करत असतात. इंटरनेटच्या अतिवापरामुळे अनेकांचे घरातील सदस्यांशी बोलणे कमी झाले आहे. म्हणूनच सर्दी, खोकला झाल्याचे सर्वात प्रथम
सोशल नेटवर्किंगवरील मित्रांना समजते, त्यानंतर घरात व्यक्तींना माहिती होते. मैदानी खेळही कमी होत चालल्यामुळे शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. अन्न, वस्त्र,
निवारा याप्रमाणे इंटरनेट ही निमशहरी व  ग्रामीण भागातही काळाची गरज होऊन बसली आहे. ई-मेल तपासणे, जगभरातील माहिती घेत राहणे यासाठी इंटरनेटचा वापर
 योग्य आहे. परंतु अधिक काळ इंटरनेट वापरात आले  तर व्यसनाच्या आहारी गेल्याची स्थिती निर्माण होते . यासाठी आपण स्वतः काही निर्बंध लादून घ्यायला हवेत असे
जाणकारांकडून सांगण्यात येते. इंटरनेटमुळे जग जवळ येऊन ठेपले आहे, माहिती मिळत आहे, हे सत्य असले तरी इंटरनेट नसल्यामुळे चिडचिडेपणा वाढत असेल,
काही सुचत नसेल तर ते मग व्यसन लागले अशीच स्थिती निर्माण होते .त्यामुळे व्यसनाच्या आहारी जायचे की मर्यादित इंटरनेटचा वापर करायचा हे प्रत्येकाने ठरविण्याची
गरज निर्माण झाली आहे.
नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे सोशल नेटवर्किंगचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही आहेतच ,मात्र या फायद्या-तोट्याचे गणित अनेकांना अद्याप समजलेले नाही. सोशल नेटवर्किंगच्या
अतिरेकामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजारही होत असतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर हे व्यसनच असून, योग्य वेळी थांबवणे गरजेचे आहे.

तर ती होऊ शकते व्याधी :
एखाद्या गोष्टीवर आपण गरजेपेक्षा अधिक अवलंबून राहू लागलो की, त्याचे व्यसन होते. सध्या  इंटरनेट आणि मोबाईलचाही त्यात समावेश होऊ लागला आहे.
अनेक जण सेकंदा-सेकंदाला आपली वैयक्तिक माहिती अगदी चौकात,कट्ट्यावर,जिथे संधी मिळेल तिथे अपलोड करताना दिसतात आधुनिक काळात इंटरनेट ही एकीकडे
सुविधा ठरत असताना तासंतास यात अडकून पडणार्या काही जणांसाठी मात्र ती व्याधी ठरण्याची शक्यताच अधिक आहे.
--------
Avinash Dudhawade, chakan ,9922457475

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)