मोबाईल वर रात्री अपरात्री वाजतेय धोक्याची घंटी
अनेकांचा बॅलन्स रिकामा
---------------
अवेळी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय "मिस कॉल' आणि "एसएमएस' ने अनेकांच्या मोबाईलचा बॅलन्स रिकामा केल्याचे प्रकार घडले आहेत. अखेर उशिरा मोबाईल कंपन्यांना
शहाणपण सुचले असून अशा प्रकारच्या कॉल आणि एसएमएसपासून सावध राहा, असे आवाहन काही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना एसएमएस द्वारे केले आहे.
मोबाईलवर वारंवार येणाऱ्या जाहिरात कंपन्यांच्या एसएमएसपासून सुटका करून घेण्यासाठी "डू नॉट डिस्टर्ब' असा संदेश पाठवता येतो. अनेकांनी सुविधेचा लाभ घेऊन मेसेज
इनबॉक्स रिकामा करून घेतला. ज्यांनी कंपनीला असे मेसेज पाठवले नाहीत त्यांना दिवसाकाठी बरेच मेसेज येतात. मेसेजबरोबर कंपन्यांच्या डायलर टोन आणि इतर
कंपन्याकडूनही थेट "कॉल' मोबाईलवर येतात. त्यासाठीही डू नॉट डिस्टर्बची सोय आहे.
देशातील कॉल आणि मिस कॉलपासून अनेकांनी सुटका करून घेतली तरी आंतरराष्ट्रीय कॉलपासून त्यांची सुटका झालेली नाही. काही महिन्यांपासून पहाटेला आंतरराष्ट्रीय कॉल
आणि एसएमएसनी मोबाईलवर धुमाकूळ घातला. त्यातल्या त्यात एका मोबाईल कंपनीच्या ग्राहकांनाच अशा प्रकारचे कॉल जास्त येतात. पहाटेच्या सुमारास आलेला मिस
कॉल पाहून कोणीतरी अडचणीत असेल म्हणून आपण कॉल केला कि मिनिटाला 30 ते 45 रुपयांपर्यंत बॅलन्स उडतो. समोरच्या व्यक्तीशी आपण जास्त वेळ बोलत राहिलो,
तर शेकडो पटीत बिलाचा आकडा जातो. एसएमएस वाचून कॉल केला तरी अशीच स्थिती असते.
आंतरराष्ट्रीय कॉल आणि एसएमएसमुळे काही दिवसांत अनेकांच्या मोबाईलमधील बॅलन्स रिकामा झाला आहे. संबंधित कंपनीत विचारणा केली असता तुम्ही कॉलची निवड
केल्याचे सांगितले जाते. वास्तविक अशी कोणाला हौस नसते; मात्र काहीतरी कारण सांगून ग्राहकांची बोळवण केली जाते.
ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी विचारात घेऊन एका मोबाईल कंपनीला अखेर शहाणपण सूचले आहे. त्या कंपनीने काही ग्राहकांना एसएमएस पाठवून आंतरराष्ट्रीय कॉल आणि
एसएमएसपासून सावध राहा, अन्यथा जादा बिलाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे.
तर फोन करूच नये :
मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला व तो क्रमांक जर +92, #90, #09 या अंकांनी सुरू होत असेल, तर त्या क्रमांकावर फोन करू नये .
कारण या क्रमांकावर फोन केल्यास सीमकार्डाचे क्लोन तयार होते व फोनमध्ये असलेली सर्व माहिती समोरच्या सीममध्ये जमा होईल. फक्त एवढेच
नव्हे तर मेमरी कार्ड व डेटा कार्डमध्ये असलेली माहितीही त्या सीमकार्डात जमा होते . या माहितीचा दुरुपयोग होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या
फोनमधील माहिती सुरक्षित राहावी यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने ग्राहकांना सतर्क राहण्याचा सल्ला माध्यमांकरवी आधीच दिला आहे.
अविनाश दुधवडे ,चाकण
Avinash Dudhawade 9922457475
--------------------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा