
मोबाईल वर रात्री अपरात्री वाजतेय धोक्याची घंटी अनेकांचा बॅलन्स रिकामा --------------- अवेळी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय "मिस कॉल' आणि "एसएमएस' ने अनेकांच्या मोबाईलचा बॅलन्स रिकामा केल्याचे प्रकार घडले आहेत. अखेर उशिरा मोबाईल कंपन्यांना शहाणपण सुचले असून अशा प्रकारच्या कॉल आणि एसएमएसपासून सावध राहा, असे आवाहन काही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना एसएमएस द्वारे केले आहे. मोबाईलवर वारंवार येणाऱ्या जाहिरात कंपन्यांच्या एसएमएसपासून सुटका करून घेण्यासाठी "डू नॉट डिस्टर्ब' असा संदेश पाठवता येतो. अनेकांनी सुविधेचा लाभ घेऊन मेसेज इनबॉक्स रिकामा करून घेतला. ज्यांनी कंपनीला असे मेसेज पाठवले नाहीत त्यांना दिवसाकाठी बरेच मेसेज येतात. मेसेजबरोबर कंपन्यांच्या डायलर टोन आणि इतर कंपन्याकडूनही थेट "कॉल' मोबाईलवर येतात. त्यासाठीही डू नॉट डिस्टर्बची सोय आहे. देशातील कॉल आणि मिस कॉलपासून अनेकांनी सुटका करून घेतली तरी आंतरराष्ट्रीय कॉलपासून त्यांची सुटका झालेली नाही. काही महिन्यांपासून पहाटेला आंतरराष्ट्रीय कॉल आणि एसएमएसनी मोबाईलवर धुमाकूळ घातला. त्यातल्या ...