
धारदार हत्याराने खून करून मृतदेह फेकला पाण्यात सिद्धेगव्हान येथील घटना चुलता आणि आजोबावर गुन्हा जमिनीच्या वादातून घडला थरारक प्रकार ------------------------- जमिनीच्या वादातून खेड तालुक्यातील सिद्धेगव्हान येथे एकाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली. हत्ये नंतर मृतदेह नदीपात्रात फेकून देण्यात आला होता.आज(दि.5)सकाळी हा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. राजेश किसन जाधव (वय 30,रा.सिद्धेगव्हान ,ता.खेड) असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून खून झालेल्या राजेशची पत्नी अरुणा हिच्या फिर्यादी वरून चाकण पोलिसांनी राजेशचा चुलता सखाराम नानाभाऊ जाधव ,व आजोबा विठ्ठल काशिनाथ जाधव ( दोघे रां. सिद्धेगव्हान ,ता.खेड) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या बाबतचे वृत्त असे की, राजेश सोमवारी (दि.4) दुपारी तीन वाजनेचे सुमारास बाहेर जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला तो पुन्हा घरी परतलाच नाही. घरातील मंडळींनी सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा काहीही थांगपत्ता लागला नाही.अखेर आज (दि.5) सकाळी सिद्धेगव्हान (...