बांगलादेशी अशी करतात भारतात घुसखोरी....


बांगलादेशी अशी करतात भारतात घुसखोरी.... 
सागरअली रफिकअली ( बंगादेशी घुसखोर) 

   भारत-बांगलादेश सिमेवरून घोसखोरी करुन, भारतात प्रवेश केलेल्या आणि , पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या चाकण एमआयडीसीमध्ये वास्तव करणाऱ्या एका २२ वर्षीय बांगलादेशी तरुणाला चाकण पोलिसांनी २७ मार्च २०१९ रोजी अटक केली होती. सागरअली रफिकअली (वय २२ वर्षे , सध्या रा. वासुली फाटा, टेट्रापेक कंपनी जवळ, मूळ पत्ता-मु. शोरूनपूर, पो. कुसुमपूर, ता. महेशपूर, जि. झिनयदा, बांगलादेश) असे अटक करण्यात आलेल्या घुसखोराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध  विविध कलमांसह  परकीय नागरिक कायदा १९४६ नुसार गुन्हा दाखल केला गेला ... 
       चाकण एमआयडीसीत वासुली गावाच्या हद्दीत  एक बांगलादेशी नागरिक पंधरा दिवसांपासून वास्तव करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी वासुली फाटा येथील टेट्रा कंपनी येथून सागरअली याला ताब्यात घेतले होते.  त्याने बनावट कागदपत्रांद्वारे भारत सरकारचे आधार आणि पॅनकार्ड बनविले होते. घुसखोर सागरअली याला  अटकेनंतर तत्काळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी येरवड्याच्या कारागृहात केली आहे.
    दरम्यान या घुसखोराशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्याने आपण नऊ वर्षापूर्वीच भारतात आल्याचे आणि मुंबईत नऊ वर्षे वास्तव्य केल्याचे धक्कादायक वास्तव त्याने सांगितले.
 त्यामुळे बांगलादेशी घुसखोर किती वर्षे वास्तव करीत आहेत.... त्यांची  नेमकी संख्या किती असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.   बांगलादेशी घुसखोर उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा महाराष्ट्र, कर्नाटक केरळात पसरत आहे. भारतात येण्याकरिता आता समुद्री मार्गाचा वापर करून आन्ध्र, ओरिसात येत आहेत. ओरिसाचे बरेच जिल्हे या स्थलांतरितांनी व्यापलेले आहेत. 


काय आहे घुसखोरांची कार्यपद्धती ..... 
बंगलादेशी घुसखोर सीमा पार करून पश्‍चिम बंगाल आणि आसाममधून येतात. पश्‍चिम बंगाल मधील काही दलाल आणि मध्यस्थ त्यांना कागदपत्रे तयार करण्यात मदत करतातच, शिवाय त्यांच्या गरिबीचा फायदा उठवणारे त्यांना लालूच देऊन अनधिकृत कामे त्यांचेकडून करवून घेत असतात आणि देशाच्या इतर भागांत जातात. ही समस्या फाळणी आणि नंतरच्या बांगलादेश निर्मितीच्या दीर्घसूत्री कार्यक्रमातूनच उद्भवते. बंगलोरमधील स्फोटमालिकांतील आरोपी असलेल्या टी. नासिर याने तपासकर्त्यांना असे सांगितले होते की, त्याने भारत-बांगलादेश सीमा अगदी सहजरीत्या पार केली होती. देशातून आत-बाहेर करण्यासाठी, त्याने सीमेवरील काही जणांना लाच दिली. भारतीय गुप्तवार्ता विभाग सांगतो की, स्थलांतरितांना खोटी कागदपत्रे पुरवणारे समाजकंटक सुरुवातीस सीमाभागातच कार्यरत असत, पण आता त्यांनी त्यांच्या कारवाया देशभर पसरवल्या आहेत.
    दलालांनी जिथे आपले जाळे विणलेले आहे, अशा बांगलादेशातून या घुसखोरीस सुरुवात होते. स्थानिक समाजकंटक त्यांना सुरक्षितरीत्या भारतात प्रवेश करण्यास मदत करतात. त्यांचे काम तिथेच संपते. भारतात त्यांना, भारताचे अधिकृत रहिवासी म्हणून ओळख देणारी खोटी कागदपत्रे पुरवणारे बरेच लोक आहेत.अनेकांनी मतदार ओळखपत्रे आणि शिधावाटपपत्रेही प्राप्त केलेली आहेत. स्थानिक पक्षांसोबतचे संबंध ही प्रक्रिया सुलभ करत असतात. आसामात अनेक अनधिकृत घुसखोरांनी तर जमीन महसूल नोंदीही प्राप्त केलेल्या आहेत.
      बंगालमधील नागरी प्रशासन बांगलादेशींना पकडण्याऐवजी अनधिकृत स्थलांतरितांनाच मदत करत आहे.  भारत व बांगलादेश दरम्यान ४०९६ कि.मी.ची सीमा असून, तेथून दहशतवाद्यांना बांगलादेशात जाण्यास अनेकदा मदत मिळत असल्याचा अंदाज आहे. जरी सीमासुरक्षा दलाने एखाद्या अनधिकृत स्थलांतरितास पकडले, तरी त्यांना कायदेशीर अडचणी येतात. स्थानिक लोक कारवाईस विरोध करताना आढळतात. कारण किनार्‍यालगतचे जिल्हे बांगलादेशी बहुसंख्य झालेले आहेत. सीमा सुरक्षादलाच्या अधिकार्‍यांविरुद्धच फर्स्ट इन्फोर्मेशन रिपोर्ट-(एफ.आय.आर.) नोंदवले जातात. त्यांच्या प्रयत्नांत बांगलादेशींना अनेकदा स्थानिक राजकारणी मदत करतात.  शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्रे मिळविणे, मतदार यादीत नाव नोंदवून घेणे, भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे तयार करणे असे सर्व उद्योग या मंडळींच्या माध्यमातून पार पाडले जातात. आजही मुंबईत, महाराष्ट्रात, बांगलादेशीची घुसखोरी होते आहे. 

एकाच माळेचे 'मनी'  ....
    २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपचे सरकार आल्यास बांगलादेशी घुसखोरांना देशभरातून पकडून त्यांच्या देशात पाठवले जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्याचे पुढे काहीही झाले नाही.  उलट २०१५ मध्ये अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स पॉवर कंपनीने बनगादेशात  मोठा वीज प्रकल्प व द्रव नैसर्गिक वायू आयात टर्मिनल उभारण्यासाठी ३ अब्ज अमेरिका डॉलर्सच्या गुंतवणूक करार केला आहे . 
 त्याचे समर्थन करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान जमीन सीमा करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याने ४१ वर्षांनंतर द्विपक्षीय संबंधात एक नवे पर्व सुरू झाले, त्यामुळे घुसखोरीची समस्या कमी होईल. असो...
    
तर बांगलादेशी बसेल प्रमुख पदावर .... 
     बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्या देशात परत पाठवले पाहिजे आणि या लोकांना भारतात राजकीय आणि अन्य सर्व प्रकारचा आश्रय देणार्‍यांविरुद्ध कडक पावले उचलली  पाहिजेत.  धक्कादायक म्हणजे  घुसखोरांनी मागील काही वर्षात ऑल आसाम डेमॉकट्रिक फ्रंट पक्ष तयार केला. सध्या या पक्षाचे आसामच्या विधानसभेत १३ आमदार व लोकसभेत ३ खासदार आहेत. बांगलादेशींना पुण्या मुंबईच नव्हे देशातील सर्व राज्यांमध्ये सुद्धा शोधले जाण्याची गरज आहे....  नाहीतर आसाम किंवा पश्‍चिम बंगाल सारख्या राज्याच्या  मुख्यमंत्रिपदी बांगलादेशी बसल्याचे पाहण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की... •••
------------
https://www.youtube.com/watch?v=MGStwBTWJis&t=29s

अविनाश दुधवडे ( पत्रकार) 

अविनाश दुधवडे, चाकण 
( स्पेशल रिपोर्ट फॉर पुणे लाईव्ह ) 
PUNE LIVE , MARATHI NEWS

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)