'बांधकाम विश्व एक्‍झिबिशन' ला भव्य प्रतिसाद

'बांधकाम विश्व एक्‍झिबिशनला भव्य प्रतिसाद
चाकण मध्ये प्रथमच आयोजन ;  १०० स्टाॅलची व्यवस्था 
Displaying chakan bandhkam vishav.jpg
चाकण : वार्ताहर -
स्वतःचे सुंदर घर असावेअसे सर्वांचेच स्वप्न असते. स्वतःच्या घराची संकल्पना पूर्ण करण्यासाठी व बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान त्याच प्रमाणे गृहसजावटगृहकर्जदुरुस्ती,देखभाल या बाबत नागरिकांना अद्ययावत माहिती मिळावी यासाठी पुणे जिल्हा सिव्हील इंजिनिअर्स असोशिएशनच्या वतीने   शुक्रवार (दि.१६) पासून सलग तीन दिवस चाकण मध्ये भव्य 'बांधकाम विश्व एक्‍झिबिशनचे आयोजन करण्यात आले आहे. 
  तीन दिवस चालणाऱ्या या एक्‍झिबिशनमध्ये चाकण सह परिसरातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित तब्बल शंभराहून अधिक स्टाॅल लावण्यात आले आहेत . गेल्या तीन वर्षांपासून या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून चाकण परिसरात मात्र प्रथमच असे भव्य एक्‍झिबिशन भरविण्यात आले आहे. एक्‍झिबिशनमध्ये नागरिकांना त्यांच्या उत्तम घराचे स्वप्न साकारण्याची संधी मिळू शकणार आहे. प्रदर्शन सकाळी नऊ ते आठपर्यंत सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. या एक्‍झिबिशनचे मुख्य प्रायोजक क्यालिफोर्निया हाईट्स असून प्रमुख समन्वयक पुणे जिल्हा सिव्हील इंजिनिअर्स असोशिएशनचे संतोष वाव्हळ आहेत.  शुक्रवारी (दि.२७)  'बांधकाम विश्व एक्‍झिबिशनचे उद्घाटन खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा सिव्हील इंजिनिअर्स असोशिएशनचे अध्यक्ष यतीनकुमार होले उपाध्यक्ष प्रमोद थेऊरकरकार्याध्यक्ष प्रशांत डुंबरेएक्‍झिबिशनचे समन्वयक संतोष वाव्हळसुधीर मांदळेराष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किरण मांजरेचाकण चे माजी उपसरपंच कालिदास वाडेकरअशोक बिरदवडेशिवसेनेचे उपतालुकाप्रमुख लक्ष्मण जाधवग्रामपंचायत सदस्य सुधीर वाघउद्योजक भरत कानपिळेसंदेश गीतेबिपीन रासकरविजयसिंह शिंदेदत्तराज वाफगावकर,निलेश गायकवाड,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप परदेशीनवनाथ शेवकरीआदी उपस्थित होते. चाकण परिसरात प्रत्येकाला आपले घर असावेअसे वाटते. यामुळेच ग्राहकांना एकाच ठिकाणी परवडणारे घरे व घरासाठीचे साहित्यपाहण्याची सर्वोत्तम संधी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मनासारखे गृहप्रकल्प ,गृहसजावटगृहकर्जदुरुस्तीदेखभाल आदी बाबतची माहिती आणि योजनांचा लाभ घेता येणार आहे. याभागातील नागरिकांनी चाकण परिसरात घर घेण्यासाठी लागणारे कर्ज पुरविण्याची जबाबदारी विविध बॅंकांनी घेतली आहे. त्यामुळे या अभिनव उपक्रमात सहभागी होऊन आपले व आपल्या पाल्यांचे भविष्य चाकण सारख्या प्रगतिशील शहरात साकार करण्यासाठी 'बांधकाम विश्व एक्‍झिबिशनउत्तम व्यासपीठ ठरले असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे इंजिनिअर्स असोशिएशनचे शिवाजी कट्टेविकास वाव्हळअमित डावरेसुनील कडसागर ताजनेजितेंद्र बागल संतोष चासकरदीपक काळभोर,आदींनी सांगितले. 
----------
 अविनाश दुधवडे,चाकण 9922457475 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)