चाकण मागोवा २०१४

चाकण मागोवा २०१४

चाकण: अविनाश दुधवडे
    औद्योगीकारणाने जवळपास विशी ओलांडलेल्या चाकण या उद्यमनगरीसाठी २०१४ सालातील सर्व क्षेत्रातील विविध घडामोडी कायम लक्षात राहतील. चाकण पंचक्रोशी आता वेगाने चौफेर वाढते आहे. चाकण परिसरातील वाड्या-वस्त्या आणि अस्सल गावरान ढंग आता लोप पावत चालला असून  राजकारण,समाजकारणगुन्हेगारी आणि अर्थकारणाने या भागात आपले वेगळे अस्तित्व दाखवून दिले आहे. ग्रामीण बाज असलेल्या या भागाचा प्रवास आता मोठ्या औद्योगीकारणाने विस्तारत्या शहराच्या दिशेने वेगाने सुरू आहे. 
   मागील वर्षात जुलै पर्यंत पावसाने वाकुल्या दाखवून नंतर भरून काढलेला बॅकलॉग व नंतर वारंवारच्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेती क्षेत्रात निरुत्साह उद्योगक्षेत्रात काही नव्या कारखान्यांच्या आगमनानंतरही व वर्षभर मंदी सदृश्य स्थिती झाल्याने निर्माण झालेली चिंतावर्षाच्या सुरुवातीस लोकसभा व अखेरीस विधानसभा निवडणुकांचा धुराळा प्रचंड टोकाचे संघर्ष औद्योगिक क्षेत्रात नवनव्या दादा-भाई मंडळींचा शिरकावआशा सुटेना अन देव भेटेना’.. म्हणी प्रमाणे चाकण नगरपालिकेचे भिजत पडलेले घोंगडेभामाआसखेडचे पाणी पुण्याला नेण्यावरून जलवाहिनीस गावागावातून झालेला टोकाचा विरोध,  अशा घटनांनी मागील २०१४ वर्ष चांगलेच गाजले.  
    मागील २०१४ वर्षे आध्यात्मिक ,सांस्कृतिककार्यक्रमांमधून सामाजिक भान जोपासून काही अंशी उत्साहवर्धक वाटणारे ठरले . तर डेंग्यू -मलेरिया आजारांचा धुमाकूळ पाण्यासाठी करावी लागणारी वणवण , चाकण एमआयडीसीतील घोंघावलेले मंदीचे सावट एकापाठोपाठ एमआयडीसीत घडलेल्या आगीच्या भीषण घटनाबैलगाडा शर्यतींचा खो-खो व निसर्गाच्या वक्र दृष्टीने शेतकऱ्यांसाठी शेतमालाचे उत्पादन घटल्याने निरुत्साहाचे ठरले त्यामुळे सरत्या २०१४ वर्षानेही शेतकऱ्यांना पुन्हा एकदा देशोधडीलाच लावले.
      राज्यभरातील विविध बॅंकाशोरूम्समॉल वाढत आहेत.  इतकेच नव्हे तर 'सेकंड होम'साठी पुणे-मुंबईकर आता चाकण पंचक्रोशीला पसंती देवू लागले आहेत . हे चित्र एकीकडे असताना दुसरीकडे सरत्या वर्षात अनधिकृत बांधकामेअतिक्रमणेगुन्हेगारीप्रचंड वाहतूक कोंडी आणि बकालपणावाढण्याचा प्रवास अधिक वेगाने झाला. मागील २०१४ वर्ष चाकणकरांना येथील रस्ते ,अखंडित वीज, मुबलक पाणी पुरवठा , स्वच्छता अशा असंख्य समस्यांचा निपटारा न झाल्याने ‘सुख राई एवढे आणि दुखः पर्वता एवढे’... या म्हणी प्रमाणे फारसे फलदायी ठरले नाही.

निवडणुकांचा रणसंग्राम :
मागील २०१४  वर्षाच्या सुरुवातीलाच सगळीकडे लोकसभा निवडणुकांची तर वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात विधानसभा निवडणुकांची लगीन घाई पहावयास मिळाली. विधानसभा निवडणुकीत आपलीच उमेदवारी निश्चित होईल या अविर्भावात इच्छुक उमेदवार अंग झटकून कामाला लागलेले राजकारणीकधी नव्हे एवढा पहावयास मिळालेला पक्षांतराचा रोगहाताच्या बोटावर मोजण्या इतपत दिवसांत प्रचाराची धुळवडमतदारांपर्यंत पोचताना उमेदवारांची झालेली दमछाकगावागावातील प्रचंड टोकाचे झालेले राजकारणविधानसभा निवडणुकीला लागलेले तुंबळ वादाचे गालबोट यामुळे विधानसभा निवडणूकीचा रणसंग्राम व चाकण परिसराला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी यामुळे पुढील अनेक वर्षे २०१४ हे वर्ष चाकणकरांच्या लक्षात राहणारे ठरले आहे. 

पोलिसांनी अनुभवले 'हेवी क्राईम'  :
सरत्या वर्षातही चाकण पोलिसांनी अनेक 'हेवी क्राईमअनुभवले. मागील वर्षभरात  ७ खून ,२ खुनाचे प्रयत्न , ६ दरोडे दरोड्याच्या तयारीचे ६ प्रकार २० जबरी चोऱ्या ५७ घरफोड्या१७६ सर्व प्रकारच्या चोऱ्या८७ वाहन चोऱ्या१० बलात्कार७ विनयभंग पळवून नेण्याचे ५ प्रकार महिला अत्याचाराचे ८ गुन्हेतब्बल १०० गंभीर स्वरूपाचे अपघात व त्यातून ६० निरपराध मृत्यूच्या दाढेत आले,  राहत्या घराला सोडचिट्ठी देवून बेपत्ता झाल्याच्या २०४ घटनातर स्वतःचाच जीवघेत झालेल्या तब्बल १२ धक्कादायक आत्महत्या अशा चक्क ६४० गुन्ह्यांच्या चढत्या आलेखाने  आणि आव्हानात्मक गुन्ह्यांच्या तपासामुळे सरते वर्ष कमी मनुष्यबळ असलेल्या चाकण पोलिसांचे कसोटी पाहणारे ठरले. चाकण मधील रस्ते अपघात ही चिंतेची बाब झाल्याचे पोलिसांची क्राईम डायरी सांगते.  औद्योगिक क्षेत्रात ठेकेदारीसाठीची धुमश्‍चक्रीमारामारीदरोडेलूटमारीचे प्रमाण वाढले आहे. विनयभंगछेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येत चाकणला वाढ होणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
Avinash Dudhawade, Reporter 

दृष्टीक्षेपात २०१४ :
घातपात-अपघातांचा चढता आलेख
विधानसभा निवडणुकीतील संघर्ष 
पुण्याच्या जलवाहिनीला झालेला प्रचंड विरोध
मुन्नाभाई डॉक्टरांवरील कारवाया
एमआयडीसीतील भीषण आगीच्या घटना
वनविभागाच्या राखवालीतून लंपास झालेले कोट्यावधीचे रक्तचंदन
वाढलेले पिस्तुल कल्चर
बांधकाम नोंदींचा गोंधळ
निवडणुकां दिसलेला पक्षांतराचा रोग
पुणे-नाशिक रेल्वेचे भिजत घोंगडे
चाकण नगरपरिषदेचा लटकलेला प्रश्न
आरटीआय कार्यकर्ते विलास बारावकर आत्महत्या
बारवकरां आत्महत्या पूर्व चिट्ठीने उडालेली खळबळ
एमआयडीसीतील कामगार व्यवस्थापन संघर्ष
बिरदवडीतील बिबट्याचा थरार     
---------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)