'बांधकाम विश्व एक्झिबिशन' ला भव्य प्रतिसाद
' बांधकाम विश्व एक्झिबिशन ' ला भव्य प्रतिसाद चाकण मध्ये प्रथमच आयोजन ; १०० स्टाॅलची व्यवस्था चाकण : वार्ताहर - स्वतःचे सुंदर घर असावे , असे सर्वांचेच स्वप्न असते. स्वतःच्या घराची संकल्पना पूर्ण करण्यासाठी व बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान त्याच प्रमाणे गृहसजावट , गृहकर्ज , दुरुस्ती , देखभाल या बाबत नागरिकांना अद्ययावत माहिती मिळावी यासाठी पुणे जिल्हा सिव्हील इंजिनिअर्स असोशिएशनच्या वतीने शुक्रवार (दि.१६) पासून सलग तीन दिवस चाकण मध्ये भव्य ' बांधकाम विश्व एक्झिबिशन ' चे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या एक्झिबिशनमध्ये चाकण सह परिसरातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित तब्बल शंभराहून अधिक स्टाॅल लावण्यात आले आहेत . गेल्या तीन वर्षांपासून या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून चाकण परिसरात मात्र प्रथमच असे भव्य एक्झिबिशन भरविण्यात आले आहे. एक्झिबिशनमध्ये नागरिकांना त्यांच्या उत्तम घराचे स्वप्न साकारण्याची संधी मिळू शकणार आहे. प्रदर्शन सकाळी नऊ ते आठपर्यंत सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. या एक्झिबिशनचे मुख्य प्रायोजक क्याल