चाकणचे माजी सरपंच गोरे यांना अखेर जामीन मंजूर
चाकणचे माजी सरपंच गोरे यांना अखेर जा मीन मंजूर न्याय मार्गाने लढा देणार : गोरे चाकण:वार्ताहर बांधकाम नोंदी व नमुना नंबर आठ चे उतारे या संदर्भात पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने पोलिसांत गुन्हा दाखल होऊन गेल्या तीन महिन्यांपासून गजाआड असलेले चाकणचे माजी सरपंच काळूराम गोरे यांना अखेर न्यायलयाने जा मीन मंजूर केला असून त्यांची मंगळवारी पुण्याहून त्यांची मुक्तता झाली आहे . सरपंच गोरे यांच्यावर पदाचा गैरवापर करून ' आठ अ ' चे बोगस उतारे देवून बेकायदा कामकाज केल्याप्रकरणी चाकणच्या सरपंचांवर येथील पोलीस ठाण्यात ( 19 जुलै रोजी) खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्रीकांत ढमढेरे यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल आला होता. दि. 20 ऑगस्ट रोजी चाकण पोलिसांनी त्यांना अटक केली होती तेंव्हापासून सरपंच गोरे गजाआड होते. या प्रकरणाच्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनेकांच्या भोवती फास आवळले होते. सरपंच काळूराम गोरे , चाकण ग्रामपंचायतीचे अधीक्षक विजय भोंडवे , उतारा मिळविणारा इसम पांडुरंग सपाट यांच्यासह आयफील सिटी या गृहप्रकल्पाचे मालक संतोष म