http://dhunt.in/bob0l
बाळासाहेब ठाकरे यांची चाकणची ती सभा न भूतो न भविष्यती अशीच ... चाकण: वार्ताहर गेल्या पाच दशकांच्या खेड तालुक्याच्या इतिहासात झालेल्या जाहीर सभा पाहिल्यास , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही आठ अक्षरे टाळून पुढे जाताच येणार नाही अशी वस्तुस्थिती तालुक्याने आणि विशेषतः चाकण करांनी पहिली आहे. एप्रिल 2004 साली चाकण च्या महात्मा फुले मार्केट च्या प्रचंड प्रांगणात लाखो नागरिकांच्या उपस्थितीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीसाठी तत्कालीन खेड लोकसभा मतदार संघाचे सेना भाजपाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेली ती सभा न भूतो न भविष्यती अशीच झाली. या सभेतही बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांचा समाचार घेतला होता ,तो त्यांच्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत.या भागात बाळासाहेबांची झालेली ती अखेरची सभा आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. छत्रपती शिवरायांची अवहेलना करणाऱ्या जेम्स लेन पासून सोनिया गांधी ,शरद पवार यांच्यावर त्यांनी कडाडून आपल्या ठाकरी शैलीत हल्ला केला होता.तर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बाबतह...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा