किरकोळ अपघातही वाहतूक कोंडीचे निमंत्रक

Displaying chakan vahatuk 2.jpg
Displaying chakan vahatuk 2.jpg
Displaying chakan vahatuk 2.jpg
Displaying chakan vahatuk 1.jpg

किरकोळ अपघातही वाहतूक कोंडीचे निमंत्रक
चाकण मधील स्थिती  
चाकण:
  प्रत्येक वाहनचालकाला झालेली घाई... त्या घाईत बेशिस्तपणे वाहने चालवत पुढे जाण्याची स्पर्धा... त्यामुळे होणारे किरकोळ अपघात आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी. चाकण मधील तळेगाव चौक (सिग्नल चौक) ते आंबेठाण चौकात हे चित्र कायमच पाहायला मिळते. सर्व्हिस रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येणारी वाहने आणि तळेगाव चौकात  सिग्नल सुटल्यानंतर शाॅर्टकट मारण्याच्या प्रयत्नात सर्व्हिस रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करीत असल्याने अनेक  वाहने समोरासमोर येत असल्यामुळे या चौकात वाहतुकीची कोंडी होणे नित्याचेच झाले आहे.
  पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील  वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्याचा रस्ता नाशिक फाटा ते चांडोली फाटा दरम्यान प्रशस्त असला तरी या  रस्त्यावरील वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने हा रस्ता ठिकठिकाणी चौकांत बेदरकार चालकांमुळे वाहतुकीची कोंडीला आणि अपघातांना निमंत्रण देत आहे. रस्त्यात किरकोळ स्वरूपाचा अपघात झाल्यानंतरही मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. चाकण  शहरातून जाणार्या जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांचा बेशिस्तपणाही शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत होता. मात्र चाकण पोलिसांनी रस्तावर लावण्यात येणाऱ्या अनेक वाहनांची 'हवा गुल'केल्याने बिनधास्त रस्त्यावर वाहने पार्किंग करणाऱ्यांना काही प्रमाणात चाप बसला आहे. मात्र पोलिसांनी कारवाई थंडावताच पुन्हा वाहने रस्त्यावर येत आहेत. पुणे नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना तळेगाव चौकात वाहनांच्या लांब रांगांमुळे बराच वेळ ताठकळत थांबावेच लागत असून आंबेठाण चौकात वाहने आडवी तिडवी शिरल्यास लांबलचक वाहतूक कोंडीचा सातत्याने अनुभव येत आहे.
-------
अविनाश लक्ष्मण दुधवडे,चाकण ९९२२४५७४७५ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आपला पुणे जिल्हा (पुणे तिथे काय उणे)