पोस्ट्स

जुलै, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
...त्या आगीची झळ चाकणच्या नगरपालिका प्रस्तावाला   मंत्रालय आगीत चाकण नगरपालिकेचा प्रस्ताव खाकच  नगरपालिकेसाठी चाकण करांना करावा लागणार वेट  प्रशासन म्हणते प्रस्ताव नव्याने मागविले  ---------------------------- मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या नगर विकास खात्याच्या दालनात सर्वप्रथम आग लागल्याने चाकण नगरपालिकेचा नगर विकास विभागाच्या उपसचिवां कडून स्वाक्षरी झालेला प्रस्ताव याच विभागाच्या सचिवांच्या कार्यालयात मंजुरीसाठी असताना जळून खाक झाला आहे.यास याच विभागाचे मंत्रालयातील उपसचिव ए.एस.जीवने यांनीही दुजोरा दिला असून दृष्टीपथात आलेल्या चाकण च्या नगरपालिकेचे घोंगडे आणखी किती दिवस भिजत पडणार असा यक्ष प्रश्न चाकणकरां समोर उभा ठाकला आहे. राज्यातील तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या आणि मोठ्या ग्रामपंचायतींचे नगरपालिका किंवा नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याची घोषणा राज्यशासनाकडून वारंवार होत असली तरी त्यासाठी प्रत्यक्षात प्रयत्न होतात का? हा संशोधनाचा विषय झाला आहे.औद्योगीकारणाने विस्तारत्या शहरांमध्ये शासनाच्या या दुटप्पी भूमिकेने अनेक असुविधा पहावयास मिळत असू