पोस्ट्स

ऑक्टोबर, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चाकण विमानतळाला हिरवा कंदिल

इमेज
पुणे परिसरातील वाढत्या औद्योगिक विकासाचा पसारा आणि फळांच्या निर्यातीस चालना देण्यासाठी पुणे-नाशिक हायवेवर चाकणजवळ नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या विमानतळाचे 'नवीन चाकण' असे नाव राहील. पुणे शहराच्या उत्तरेला ३५ किमी अंतरावर नाशिक हायवेवर चाकण व खेड दरम्यान भीमा नदीच्या उत्तरेस एमआयडीसीजवळ सार्वजनिक-खासगी सहभागावर हा विमानतळ उभारण्यात येईल. त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस विशेष हेतू कंपनी म्हणून मान्यता दिली आहे. ३ हजार ३६५ हेक्टर जमीन संपादित केली जाईल. प्रकल्प खर्चास मान्यता, राज्य सरकार, केंद सरकार, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि खाजगी कंपन्यांचा किती सहभाग असावा याबाबत स्वतंत्र आदेश नंतर जारी करण्यात येतील. खानदेशातील जळगाव विमानतळाचा विस्तारासाठी ते विमानतळ इंडियन एअरपोर्ट अॅथॉरिटी आणि केंदाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला. नवीन विकासासाठी आणखी ४१ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.

चाकण

इमेज
चाकण जिल्हा पुणे राज्य महाराष्ट्र लोकसंख्या २१,९६३ २००१ दूरध्वनी संकेतांक ०२१३५ टपाल संकेतांक ४१० ५०१ वाहन संकेतांक महा - १४ चाकण हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. चाकण शहरानजीक प्रस्तावित विमानतळ होणार आहे. जवळच वेगाने विकास होणारी औद्योगिक महामडंळाचे कारखाने आहेत. शहरातुन नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग जातो. पासून मिळविले वर्ग : पुणे जिल्ह्यातील

चाकणजवळच्या विमानतळाची जागा

इमेज
स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे चाकणजवळच्या विमानतळाची जागा बदलण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली. मात्र, नवा विमानतळ खेड तालुक्यातच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.